Pune Traffic : पुढचे दोन दिवस पुण्यात जाणं आव्हान; बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल

Pune Traffic : पुढचे दोन दिवस पुण्यात जाणं आव्हान; बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमामुळे वाहतुकीत बदल

Pune Traffic : पुढील दोन दिवस पुण्यामध्ये वाहतुकीमध्ये (Pune Traffic) बदल केले जाणार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये जाणे एक आव्हान असणार आहे. याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये बागेश्वरधामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये जाताना बदल करण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कसा असणार आहे हा वाहतुकीतील पाहूयात…

पुढचे दोन दिवस पुण्यात जाणं आव्हान…

पुण्यात संगमवाडी येथील निकम फार्म येथे आजपासून बागेश्वर महाराजांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिसरात पुणे वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत. कारण या कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहता वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. तर संगमवाडी या भागामध्ये विशेषतः परराज्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. हा थांबा तात्पुरता खराडी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला आहे.

World Cup विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद! पायाखाली ट्रॉफी घेत मिचेल मार्शचे फोटोसेशन

तर वाहतुकीत केलेल्या बदलांनुसार पिंपरी-चिंचवडहून संगमवाडी थांब्यावर येणाऱ्या खाजगी बस खडकी, होळकर पूल, येरवडा मार्गे, खराडी जकात नाका येथे जातील तर नगर रस्त्यावरून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या खाजगी बस नगर रस्ता येरवडा, होळकर पूल, खडकी मार्गे इच्छित स्थळी जातील. त्याचबरोबर गणेश खिंड रस्त्याने येणाऱ्या खाजगी बस शिवाजीनगर, वेधशाळा चौक, संगम पूल, बंडगार्डन रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू या मार्गे नगरकडे जातील.

Traffic Rules: रजनीकांतच्या नातवाने रस्त्यावर असं काही केलं की वाहतूक पोलिसाने ठोठावला दंड

त्याचबरोबर नगर रस्त्यावरून संगमवाडी बस थांब्यावर येणाऱ्या बससाठी पुढील दोन दिवस प्रवेश बंद राहणार आहे त्यामुळे खाजगी बस चालकांनी वाटेत प्रवाशांच्या सोयीनुसार उतरण्यास सांगावे. खाजगी बस संगमवाडी कडे न आणता अन्य ठिकाणी लावाव्यात असा आव्हान देखील पुणे वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले.

इतिहासाचा दाखला, मंत्र्यांवर निशाणा; पुण्याच्या खराडीत जरांगेंनी पुन्हा फुंकलं रणशिंग

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) महाराज यांचा दरबार आणि हनुमान कथा सत्संग कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्यातही भरवला जात आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी हा बागेश्वर धाम महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरात यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेत आहे. मात्र, आता या कार्यक्रमाला आता अंनिसने (Maharashtra Superstition Eradication Committee) विरोध दर्शवला आहे.

पुण्यातील अनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी माध्ममांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम पुण्यात होतोय. त्यांनी संत तुकाराम महाराजांविषयी अपशब्द वापरले. त्यांचा दरबार, सत्संग पुण्यात होऊ नये, यासाठी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनिसच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. ते जादूटोना करतात. त्यामुळं त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत कडक कारवाई व्हावी, ही अनिसची मागणी असल्याचं देशमुख म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube