इतिहासाचा दाखला, मंत्र्यांवर निशाणा; पुण्याच्या खराडीत जरांगेंनी पुन्हा फुंकलं रणशिंग

  • Written By: Published:
इतिहासाचा दाखला, मंत्र्यांवर निशाणा; पुण्याच्या खराडीत जरांगेंनी पुन्हा फुंकलं रणशिंग

Manoj Jarange Patil Rally In Pune Kharadi Area : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज (दि.20) जरांगे पाटलांची सभा पुण्यातील खराडी परिसरात पार पडली. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखल देत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाने कधीही जात पाहिली नसल्याचे म्हणत मराठा समाजाने नेत्यांना मोठं केलं. मात्र, आज तेच नेते मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे. आम्हाला हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी दिल असतं तर जगातील सगळ्यात प्रगत जातं म्हणून मराठे असते असेही जरांगे पाटील म्हणाले. ते पुण्यातील खराडी भागात आयोजित सभेत बोलत होते.

IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट

मराठा समाजानं कधी जातीवाद केला नाही

उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. प्रत्येकाच्या सुख-दुःखात माझा मराठा धावून गेल्याचे सांगत मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझा मराठा समाज सगळ्यांच्या कल्याणसाथी उभा राहिला, कधी जातीवाद नाही केला सगळ्यांच्या पाठीवरून हात फिरवला असे म्हणत कोणत्याही समाजाचा माणूस आला तरी माणुसकी जागी व्हायची, कधी कोणाची जातं पहिली नाही असे जरांगे म्हणाले. आम्हाला आरक्षण असतांनाही आमचे पोर बेरोजगार राहिले. आम्ही हुशार असतांनाही ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आरक्षणासाठी आमच्या लेकरांचे मूडदे पडायला लागले हे आता सहन होत नाही त्यामुळे आता सरकारला सुट्टी नसल्याचा पुनुरूच्चार जरांगेंनी केला.

World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली ‘नवी’ चोकर्स?

प्रत्येकाच्या सुखात दुःखात माझा बापजादा मराठा धावून गेला. स्वतःच्या लेकराला एक वेळेच खायला दिल नाही पण दुसऱ्याच्या लेकराला उपाशी राहू दिल नाही. जातं माझ्या मायबाप मराठ्याला शिवली नाही त्यांची जातं कधी जातं जागी झाली नाही लोकांचा द्वेष केला नाही. आरक्षण देताना कोणाला मिळालं आणि कोणाला मिळालं नाही याबाबत ब्र शब्द काढला नाही. आम्ही ज्यांना ज्यांना मदत केली ते आम्हाला वेळ आल्यावर उभा राहतील असं वाटत होत. सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम मराठ्यांनी केल त्यांच्यात जातं पहिली नाही पण, ज्यांना मोठं केल ते आज आमच्या मदतीला येत नसल्याची खंत जरांगेंनी बोलून दाखवली.

आमची काय चूक झाली की…

आमची अशी काय चूक झाली की आम्ही मोठे केलेलं ते ढुंकून पाहत नाही, आमच्या बापजाड्याची तीच चूक झालं ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनीच घात केला. ज्यांना मोठं केल तो तरी मदतीला येईल ही आशा आता मावळली ज्यांना मदत केली तेही पाठीशी नाहीत. ज्यांना आपल्या बापजद्याने मोठं केल तोच समोर उभा आहे आणि म्हणतोय मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही. त्यामुळे आता जर आपल्याला आरक्षण हवं असेल तर, ही संघर्षाची वेळ असून, आता तरी जागे व्हा असे आवाहन जरांगेंनी केले आहे.

Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!

बुडाखाली पुरावे लपून ठेवले

मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यासाठी सगळ्या समित्या झाल्या त्यांनी पुरावे शोधले, मात्र बुडाखाली पुरावे लपून ठेवले आणि म्हणाले पुरावे नाहीत अशी घणाघाती टीकादेखील जरांगेंनी केली. विदर्भातील मराठ्यांचा व्यवसाय शेती माळी बांधवांचा व्यवसाय शेती मग मराठ्यांना का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. समितीने काम सुरु केल आणि मराठ्यांचे पुरावे सापडू लागल्याचे सांगत महाराष्ट्रात आत्तापर्यंत 29लाख नोंदी सापडल्याचे ते म्हणाले. जर आम्ही आरक्षणात होतो तर 75 वर्ष आमच वाटोळं कोणी केलं असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे. आता आम्हाला आरक्षण कोणी दिल नाही त्याच नावं आता आम्हाला हवं असल्याचे ते म्हणाले.

पुन्हा फुंकलं रणशिंग

आरक्षणाची मागणी करताना जरांगे पाटलांनी माझ्या म्हणजे मराठा समाजातील बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. तर, प्रत्येकाला आधार देण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. समाजानं स्वत: चं लेकरू उघड पडलं तरी, दुसऱ्याच्या लेकरांना सगळं दिल्याचा पुनुरूच्चार जरांगेंनी केला. पण आता आपल्या लेकरांसाठी लढण्याची गरज असल्याचे सांगत समाजाला सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे असे सांगत जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षासाठी रणशिंग फुंकलं आहे.

Jarange Vs Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात’; जरांगेंचा भुजबळांना टोला

टाईम बॉन्डवरून सरकारला अल्टिमेटम

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अवधी दिला आहे. तर, राज्य सरकारकडून 2 जानेवारीपर्यंतचा वेळ मागण्यात आला आहे. या दोन्ही तारखांवरदेखील जरांगेंनी सरकारचे कान टोचले. ते म्हणाले की, आरक्षणाबाबत देण्यात आलेल्या टाईम बॉन्डबाबत आपण सरकारला आज शेवटचं विचारण असून, राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्याचा दावादेखील मनोज जरांगेनी केला आहे. त्यामुळे वेळ आणि तारखांच्या मुद्द्यावरून जरांगे आणि राज्य सरकार पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube