Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!

Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं सोडणार नाही, अशी धमकीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मराठा आरक्षणविरोधी नेत्यांना दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलायं. अशातच मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवरुन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना खुलेआम धमकीच दिली आहे. रायगडमधील महाडमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

Sharad Pawar : ‘मी कुठेच नसलो तरी सगळीकडे, दुखण्याची नोंद घेतली’; शरद पवारांच्या निशाण्यावर कोण?

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं सोडणार नाही पण आता लेकराबाळांच्या तोंडाला घास आलेला आहे. आपण जर काय बोललो तर लेकरांच्या तोंडाला आलेल्या घासात माती पडणं त्यामुळे मी सहन करतोयं. नाहीतर मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोललं तर मी गप्प बसत नाही, तो कोणत्याही जातीचा असूद्या टप्प्यात आल्यावर वाजवतोचं त्याला सोडत नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

तसेच मला काही नको फक्त मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षणाचा आनंद हवा आहे. या लढ्यात मी फक्त नाममात्र आहे, समाज एकवटला म्हणून हे झालं आहे. माझ्या जातीत हे मी देणं लागतो म्हणून मी हे करतोयं, आता आपण 70 टक्के लढाई जिंकलोयं, होणारा विजय मराठ्यांचा असणार, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

Nana Patekar: व्हायरल व्हिडिओवर नाना पाटेकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले, “मी कोणालाही…”

आपला फोकस आहे, एकच मराठा आरक्षण. ओबीसी बांधवही आपलेच आहेत. काही त्यांकडून दोन समाजात झुंज लावण्याचं काम सुरु आहे पण 24 डिसेंबरला होणारा विजय हा मराठा समाजाला असणार आहे. मराठा एकदाका पेटला की आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही, या शब्दांत जरांगे पाटलांनी विरोधकांनी इशारा दिला आहे.

सध्या नको, सध्या एकदम जवळ दिवस आला आहे. समितीचा पहिला अहवाल स्विकारलायं दुसराही स्विकारतील. सरकारने 24 डिसेंबर तारीख घेतलेली आहे फक्त शक्ती वाढवा गावं तिथं 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण बसलं पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजबांधवांना केलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केल्याचं दिसून आलं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी ओबीसीमध्ये सरसकट मराठा बांधवांना आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. एवढंच नाहीतर मनोज जरांगे यांच्यावर जालन्यातील ओबीसी एल्गार मेळाव्यातून जोरदार हल्लाबोल चढवल्याचं दिसून आले आहेत. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube