‘मराठ्यांनी तुमची बनेल अन् चड्डीपण..,’; जरांगे पाटलांनी बोर्ड फाडणाऱ्यांना सज्जड दम भरला

‘मराठ्यांनी तुमची बनेल अन् चड्डीपण..,’; जरांगे पाटलांनी बोर्ड फाडणाऱ्यांना सज्जड दम भरला

Manoj Jarange Patil : भोकरदनमध्ये तुम्ही फक्त बोर्ड फाडलायं, मराठ्यांनी बनेल अन् चड्डीपण फाडली असती, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी समाजकंटकांना दम भरला आहे. जालन्यातील भोकरदनमध्ये गावंबदीच्या बोर्डवरुन मराठा बांधवाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. जरांगे पाटील यांचा सध्या राज्यभर दौरा सुरु आहे. ते आज पुणे दौऱ्यावर होते. दौंडमधील वरवंडीमध्ये ते बोलत होते.

Raju Shetti : ‘ईडी’च्या भीतीने उंदरासारखे पळाले; राजू शेट्टींच्या निशाण्यावर नेमकं कोण?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, जे आपले नाहीत त्यांना मराठा समाजाने मोठं केलं आहे. भोकरदनमध्ये नेत्यांना गावबंदी असलेला बोर्ड फाडण्यात आला आहे. बोर्डावरुन कुऱ्हाडीने मराठ्यांच्या पोरांना मारहाण करण्यात आली. मराठ्यांनी जर त्याचं घर पाहिलं तर त्याचं काय झालं असतं…त्यांनी फक्त बोर्ड फाडला मराठ्यांनी बनेलसहित चड्डीपण फाडली असती, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

शतकांचा ‘विराट’ बादशाह; किंग कोहलीने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला वानखेडेवरच टाकले मागे

नेमकं काय घडलं होतं?
भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली. गावातील चौकात गावबंदीचं पोस्टर एका बोर्डवर लावलं होतं. गावातीलच दुसऱ्या एका गटाने हे पोस्टर फाडून बोर्ड काढून टाकल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. सीसीटीव्हीच्या आधारे बोर्ड काढणाऱ्या गावातील एका गटाच्या पुढाऱ्याला जाब विचारण्यात आला. या प्रकारानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सात मराठा तरुणांसह मध्यस्थी करायला गेलेले सरपंचही गंभीर जखमी झाले.

Subrata Roy : ‘स्कूटरवर स्नॅक्स विकले अन् उभा केला दीड लाख कोटींचा व्यवसाय’; सुब्रतो रॉय यांचा जिद्दीचा प्रवास

तसेच ज्यांनी मराठ्यांच्या पोरांना मारहाण केलीयं त्यांच्या गाडीचे टायर कधी मराठे काढतील ते समजणार नाही. हे आधी रोजाने कामाला जात होते, त्यांना मराठ्यांनी मोठं केलं अन् ते आज आरक्षणाला विरोध करु लागलेत. आता जो आपला तोच आपला आहे. बोर्ड फाडणाऱ्याचं मराठ्यांनी मनावर घेतलं तर आयुष्यभर गुलाल लावू द्यायचे नाहीत त्याला ऊसच तोडायला जावं लागणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

समाजात काही लोकं मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. त्यांनी गोरगरीबांच्या तोंडाला घास आलायं त्याच्यात आता विष कालवायचं काम करु नका. 24 डिसेंबरला सरकारने कायदा पारित करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही. सरकार जो काही निर्णय घेईल तो जड जाईल पण फक्त
आपल्यात मतभेद होऊ देऊ नका, कोणता नेता विरोध करतोयं त्याच्याकडे बारकाईने बघा. लेकरांचं वाटोळं करण्यात नेत्यांचा हात असेल तर त्याला दाराला शिऊ देऊ नका, असंही जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना संबोधित करताना म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube