Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं? 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं? 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange : मराठा समाजानं आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडीत काढला, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी म्हटलं आहे. राज्यातील (Maharashtra)सर्वच जिल्ह्यांमध्ये नोंदी सापडत आहेत. त्यामुळे 35 -40 टक्के लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आपण समाजासमोर मांडू असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

Virendra Pradhan: सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत; म्हणाले, ‘मालिका अर्ध्यावर…’

मुंबईमध्ये (Mumbai)सकल मराठा समाजाची एक बैठक झाली त्यामध्ये मराठा समाजाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यावरुन मनोज जरांगे म्हणाले की, मी समाजाचा सेवक म्हणून काम करणार आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही अन् माझ्या जिवात जीव असेपर्यंत मीही थांबणार नाही असा शब्द त्यांनी दिला.

सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये दुसरा ठराव झाला आणि त्यामध्ये ठरले की, लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावं आणि ते ओबीसीमधूनच देण्यात यावे, त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आणि 50 टक्क्यांच्या आतूनच आरक्षण मिळणार, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, त्याच्यात काहीही बदल नाही,तीच समाजाची भावना आणि भूमिका आहे. तीच आपण रेटून धरणार आणि मिळवून घेणार, त्याशिवाय माघार नाही, असेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच घेणार आहोत. मराठा समाजासाठी 75 वर्षांमध्ये कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आम्ही मांडणार आहोत. पण आज मराठा समाजाचा अजेंडा एकच आहे की, मागचं काय झालं? हे 24 डिसेंबरपर्यंत आम्ही काढत नाही, पण त्यानंतर मात्र कोणालाही सुट्टी नाही असेही यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube