Virendra Pradhan: सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत; म्हणाले, ‘मालिका अर्ध्यावर…’

Virendra Pradhan: सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत; म्हणाले, ‘मालिका अर्ध्यावर…’

Virendra Pradhan Post: ‘झी मराठी’ वाहिनीवर (Zee Marathi) ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही (Shyamchi Aai serial) सिरीयल फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र, टीआरपी नसल्याने 6 महिन्यामध्येच ही सिरीयल बंद करण्याचा निर्णय दिग्दर्शकान हाती घेतला. आता नुकताच साने गुरुजींवर आधारित ‘श्यामची आई’ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे ‘यशोदा’ (Yashoda serial) सिरियलचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान (Virendra Pradhan) यांनी “आमची मालिका बंद झाली मात्र, हा नव्याने प्रदर्शित झालेला सिनेमा आवर्जून पाहा’ अशी पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे.


श्याम ची आई हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय . माझ्या मते काही पुण्यकर्मे जर आपल्याला करायची असतील , त्यानी आवर्जून हा चित्रपट पहावा. आपल्या आजी आजोबांना , आई वडिलाना , मुलांना , विद्यार्थ्यांना दाखवावा . मी यशोदा गोष्ट श्याम च्या आई ची ही मालिका करायचा प्रयत्न केला परंतु पुरेसा प्रेक्षक वर्ग न मिळाल्या मुळे , मालिका अर्ध्यावर बंद करावी लागली . परंतु या चित्रपटा बद्दल असे होऊ नये . टीआरपी नाही म्हणून मालिका बंद करायची ताकद जशी वाहिन्यांना असते , तशी ,असे चित्रपट , नाटक , मालिका पुढील पिढ्यां पर्यंत राखून ठेवायची ताकद प्रेक्षकांमध्ये यायला हवी . चांगलं बघायला मिळत नाही अशी नेहमी ओरड ऐकू येते . मग जे चांगलं आहे ते टिकवायचे पुण्य कर्म आपल्या हातून व्हावे . दीपावली आहे . आनंद घ्या , आनंद वाटा . आपल्या मुलांसाठी हे आवश्यक आहे . त्यांनी उत्तम माणूस होण्यासाठी , या देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी , हा संस्कारांचा अग्निहोत्र पाहिला पाहिजे . मनात रुजवला पाहिजे . जात धर्म या पलिकडे जाऊन , ही आई आणि मुलाची सुंदर गोष्ट पाहिली पाहिजे .साने गुरुजी , साधना प्रकाशन , सुधाताई साने यांच्या पुण्यकर्माने , आशिर्वादाने हा चित्रपट घराघरात पोहोचावा . चित्रपट निर्माते , दिग्दर्शक आणि टीम यांना उदंड यश लाभो .

विरेंद्र प्रधान यांना ऐतिहासिक सिरियलच्या दिग्दर्शनासाठी ओळखलं जातं. त्यांनी आतापर्यंत ‘उंच माझा झोका’, ‘स्वामिनी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची’, ‘भाग्यविधाता’ अशा अनेक गाजलेल्या सिरियलच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Namrata Sambherao: नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास! नवऱ्यासोबत झळकणार ‘या’ सिनेमात

विरेंद्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया देत आपली मतं व्यक्त केली आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘याला म्हणतात मनाचा मोठेपणा…किती तळमळ…किती कळकळीने ही भावनिक साद घातली आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने या पोस्टवर “शाब्बास विरेंद्र जी….एका दिग्दर्शकाने, निर्मात्याने….स्वतःचे दुःख विसर्जित करून, दुसर्‍या दिग्दर्शकाला, निर्मितीला मनापासून दाद देत आहात… अशा भावनिक कॉमेंट्स सध्या या पोस्ट ला मिळत आहेत. आणि विरेंद्र प्रधान यांचं सर्वत्र तोंडभरून कौतुक केलं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube