‘मराठ्यांचे मुडदे पाडायला तुम्हीच जबाबदार’; वडेट्टीवारांवर मनोज जरांगे भडकले
Manoj Jarange On Vijay Wadettivar : मराठ्यांचे मुडदे पाडायला तुम्हीच जबाबदार असल्याचा घणाघात आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(manoj jarange patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर(Vijay Wadettivar) केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची परिस्थिती असताना विजय वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणावर आरक्षण शक्य नसल्याचं भाष्य केलं होतं. त्यावरुन मनोज जरांगे पाटील वडेट्टीवारांवर चांगलेच भडकले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे पण’.. वळसे पाटलांनाही खटकलं भुजबळांचं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पाडायला तुम्ही जबाबदार आहात. सहा जणांनी आमचे वाटोळं केले, त्या सहा लोकांची नावे येत्या 24 तारखेला सांगतो, असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
न्यायाधीशांना अंतरवाली सराटीत पाठविण्याची आयडिया कोणाची : बच्चू कडूंनी सांगितलं गुपीत
तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळाले असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वेळोवेळी वेगवगेळी वक्तव्य करून वडेट्टीवार सरड्यासारखे रंग बदलत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.
विरोधी पक्षनेत्याला गर्व झालायं, विरोधी पक्षनेता हे जनतेला न्याय देणारं ते हक्काचं घर, न्यायमंदिर आहे. विरोधी पक्षनेत्यालाच आता स्वत:च्या जातीविषयी गर्व झाला आहे, असा विरोधी पक्षनेता असतो का? असा खोचक सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काय म्हणाले होते वडेट्टीवार?
आरक्षण द्यायचं असेल तर कोणत्याही समाजाला आरक्षणासाठी प्रक्रियेतून जावं लागतं. कोणत्याही समाजाला आपलं शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा सिद्ध करावाच लागतो. या प्रक्रियेसाठी राज्य ओबीसी आयोग, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करावं लागत असल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं होतं.
विरोधी पक्षनेत्याला पक्ष मोठा करण्याचं काम दिलं आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचं काम दिलंय का? हेच तुमचे विचार आहेत का? तुमचे विचार पक्ष मोठा करण्यासाठी हवेत, राहुल गांधींंनीच मराठ्यांच्याविरोधात काहीही खोटं बोलण्याचं शिकवलंयं का? असे भरमसाठ सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.