‘विरोधी पक्षनेत्याला स्वत:च्या जातीचा गर्व झालायं’; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

‘विरोधी पक्षनेत्याला स्वत:च्या जातीचा गर्व झालायं’; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil Vs Vijay Wadettivar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी आणि मराठा बांधव एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळांनंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मराठा आरक्षणावर तिखट भाष्य केलं आहे. वडेट्टीवारांच्या भाष्यावर जातीचा गर्व झाला असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Apurva Song: ‘अपूर्वा’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज; तारा सुतारियाचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

जरांगे म्हणाले, विरोधी पक्षनेत्याला गर्व झालायं, विरोधी पक्षनेता हे जनतेला न्याय देणारं ते हक्काचं घर, न्यायमंदिर आहे. विरोधी पक्षनेत्यालाच आता स्वत:च्या जातीविषयी गर्व झाला आहे, असा विरोधी पक्षनेता असतो का? असा खोचक सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Air Quality : हवेची गुणवत्ता खालावली! CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रदुषण रोखण्याच्या दिल्या सूचना

तसेच सरकारने न्याय दिला नाहीतर एकच घर आहे, विरोधी पक्षनेता त्याला आम्ही न्यायमंदिर म्हणतो. जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेता आवाज उठवतो हा विरोधी पक्षनेता कोपऱ्याकापऱ्यात एकच जात घेऊन बोलतो, अशी जळजळीत टीकाही मनोज जरांगे पाटलांनी वडेट्टीवारांवर केली आहे.

कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय

विरोधी पक्षनेत्याला पक्ष मोठा करण्याचं काम दिलं आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचं काम दिलंय का? हेच तुमचे विचार आहेत का? तुमचे विचार पक्ष मोठा करण्यासाठी हवेत, राहुल गांधींंनीच मराठ्यांच्याविरोधात काहीही खोटं बोलण्याचं शिकवलंयं का? असे भरमसाठ सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
आरक्षण द्यायचं असेल तर कोणत्याही समाजाला आरक्षणासाठी प्रक्रियेतून जावं लागतं. कोणत्याही समाजाला आपलं शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा सिद्ध करावाच लागतो. या प्रक्रियेसाठी राज्य ओबीसी आयोग, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करावं लागत असल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube