कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय

  • Written By: Published:
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा, असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला होता. दरम्यान, महापूजेचा पेच सोडवण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला.

रोहित पवार आता चौंडीतून युवा संघर्ष यात्रा काढणार, आजोबांच्या वाढदिवसाचा योग जुळवला ! 

मराठा समाजाचा रोष पाहून मंदिर समितीने कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण ने देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या यासंबंधीच्या भावना शासनाला कळवण्याता येणार असल्याची माहिती विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! लोकपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आणि मानाचा वारकरी करतात. गेल्या वर्षी कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. हा महापूजेचा पेच मार्गी लावण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत घुसून मराठा तरुणांनी कोणत्याही नेत्याला महापुजेला निमंत्रित करू नका, आम्ही पूजा करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतला.

ही आक्रमकता पाहून मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराजांनी महापूजेचा निर्णय शासनाचा असतो, पूजेला कोण येणार हे राज्याचा विधी व न्याय विभाग निर्णय घेतो. आम्ही कोणालाही निमंत्रण देणार नाही, असं स्पष्ट केलं.

ते म्हणाले, मराठा समाज आक्रमक झाला. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत आम्ही कोणत्याही मंत्र्याला व नेत्याला पंढरपुरमध्ये येऊ देणार नाही, ही आंदोलकांची भूमिका आहे. आम्ही ही गोष्ट राज्य शासनाच्या कानावर आणि विधी व न्याय विभागाच्या कानावर घालू, असं या बैठकीनंतर औसेकर महाराज म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube