गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार का ? याची मोठी चर्चा रंगली आहे. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत.
यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गायकवाड म्हणाले की, “आमच्या डबल इंजिन सरकारला जर अजित दादांचं तिसरं इंजिन लागलं तर आम्हाला आनंद आहे. अजित दादा जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर डबल इंजिन सरकारला मोठी गती मिळेल. आम्ही त्यांचं स्वागत करू.”
Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य
दरम्यान राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे भाजपसोबत दिसणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यामुळे अजित पवार पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे. यातच अजित पवार यांचं या विषयावर असलेले मौन देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे.
दादा जिथे आम्ही तिथे…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा
दरम्यान भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे.