Download App

विश्वास नसेल तर रुग्णालयात काम करुन काय फायदा? डॉ. तात्याराव लहानेंचा सवाल

Dr. Tatyarao Lahane : जे.जे. रुग्णालयात (J.J. Hospital)750 निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane )यांच्यासह नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी मोतीबिंदूंची (Cataracts)शस्त्रक्रिया करु दिली जात नसल्याची तक्रार केली होती, त्यावरुन मोठा गोंधळ उडाला. त्यावर आता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण तीस वर्ष काम करुनही आमच्यावर विश्वास न ठेवता जे सहा महिन्यांपूर्वी आलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवला जात असेल तर या रुग्णालयात काम करुन काय फायदा नाही, असं म्हणत तात्याराव लहाने यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे.

हिंदुंचा अपमान म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बत दुकान, आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी (Resident Doctor)मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करु दिली जात नाही असं सांगून त्यांनी असहकार सुरु केला. त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही त्यांना नियमानुसार जे काही एनएमसीचे नियम आहेत की, त्यांचे ट्रेनिंग सुरु असताना टप्प्याटप्प्याने करावे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा त्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंग करतो.

आमचे जे तिसऱ्या वर्षाचे डॉक्टर आहेत, त्यांनीही लिहून दिलं आहे की,या विभागामध्ये सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि त्यांचा आमच्या विभागाचा तीन वर्षांचा अनुभव आहे पण ते लक्षात न घेता सहा महिण्यांपूर्वी जे डॉक्टर रुजू झाले त्यांचं लक्षात घेऊन प्रशासनानं आमची चौकशी सुरु केली आहे. चौकशी अधिकारी म्हणून डॉ. अशोक आनंद यांची नियुक्ती केली. की, ज्यांची चौकशी डॉ. रागीणी पारेख यांनी केली होती, आणि त्यांनी आमच्या पाच डॉक्टरांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं, BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’

आम्ही असं सांगितलं की त्यांना तुम्ही बदला आणि कोणीही दुसरा नेमा आम्ही चौकशीला येण्यासाठी तयार आहोत, पण तसं न करता प्रशासनानं एकाच बाजूनं चौकशी करुन रिपोर्ट शासनाला पाठवण्यात आला. आमचं असं म्हणणं आहे की, जे रुग्ण आमच्याकडे येतात त्या रुग्णांवर आम्ही नक्की शिकवतो पण त्यासाठी ट्रेनिंग गरजेचं असतं, कारण डोळा हा अतिशय संवेदनशील अवयव आहे, आणि दृष्टीशी संबंधीत असल्यामुळे आपण अंधत्व निवारणाचं काम करतो, आपण अंधत्व आणण्याचं काम करत नाही, असंही डॉ.तात्याराव लहाने म्हणाले.

डॉ. लहाने म्हणाले की, त्यासाठी आम्ही सर्वांनी खूप विचार केला पण त्याच्यानंतर डॉ. सुमीत येऊन तिथे कॅन्सरचे रुग्ण जे आहेत,त्यांच्यावर उपचार करतात, कारण त्यांनी राजीनामा दिला आहे. पण असे एक्सपर्ट बोलावण्याची आपल्याला परवानगी असते, पण त्याहीनंतर त्याची चौकशी करणे, त्याच्यावर पोलिसांकडे त्याची तक्रार करणे अशा सगळ्या गोष्टी प्रशासनाकडून होत राहिल्या.

‘चाटूगिरीचा उत्सांग’ म्हणत आमदार नितेश राणेंनी पुन्हा राऊतांना डिवचलं

प्रशासनाकडून गेल्या एक वर्षामध्ये या विभागाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही तरी आम्ही हा विभाग चालवत होतो, पण हा रोजचाच त्रास असल्याने आम्ही सर्वजण कंटाळलो. एवढ्या खोट्या तक्रारी ज्याची शहानिशा नाही, आम्ही तीस वर्ष काम केलेलं लक्षात न घेता सहा महिन्यांपूर्वी आलेल्या निवासी डॉक्टरांची तक्रार घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही, मग आम्ही आमच्यावर विश्वासच नाही तर इथं काम करणं योग्य होणार नाही, म्हणून आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आहे, आणि डॉ. रागीणी पारेख यांनी व्हीआरएस घेतली आहे, तसं पत्र अधिष्ठांतांना दिलं आहे, आणि सचिव महोदयांना भेटून आम्ही ते पत्र दिलं आहे, असंही यावेळी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे.

Tags

follow us