हिंदुंचा अपमान म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बत दुकान, आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

हिंदुंचा अपमान म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बत दुकान, आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

हिदुंचा अपमान करणं म्हणजे राहुल गांधींचं मोहब्बतचं दुकान असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह थेट राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.

दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

आमदार राणे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोहब्बतच्या दुकानात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. कर्नाटकात हिंदुंच्या मंदिराबाहेर डिजे लावून हिरवे झेंडे फडकवले जात आहेत. राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानमध्ये हिंदुंना जागा नसून आज कर्नाटकात हिंदुंची काय परिस्थिती आहे ते जरा जाऊन पहा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवालांना पाठिंबा देणार का? ओवेसी म्हणाले- ‘मी कधी…’

तसेच राहुल गांधींना जेव्हा हिंदुंचं मतदान पाहिजे असतं, तेव्हा ते मतदारांना साष्टांग नमस्कार घालत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या साष्टांग नमस्कारावरुन त्यांची खिल्ली उडवली जात आहे. तसेच सेंगोलच्या मुद्द्यावरुन त्यांची खिल्ली उडवली गेली पण काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते हिंदु धर्माची बदनामी करतात आणि अशा व्यक्तीला संजय राऊत यांनी सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली म्हणणं कितपत योग्य आहे? असा उपरोधिक सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी करीत असलेलं कृत्य संजय राऊत आणि त्यांच्या मालकांना मान्य आहे काय? यालाच आपण उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व म्हणतो काय? असा सवाल करीत त्यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube