Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं, BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’

Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं,  BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’

Pankaja Munde’s statement distortion, Chandrasekhar Bawankule’s reaction : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भाजपात घुसमट होत असल्याचं आता पुढं आलं. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझी आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

मुंडे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा पूर्ण विपर्यास करण्यात आला आहे. मी स्वत: त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले आहे. भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या मागे असल्याचे पंकजाताईंनी म्हटलं आहे. पंकजाताई या भाजपच्या नेत्या आहेत. त्यामुळं त्यांच्या भाषणाचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजाताई ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, त्या पक्षाच्या जनसंपर्क अभियानात सहभागी झाल्या आहेत. मध्य प्रदेशात अनेक सभा होत आहेत. त्या नाराज नाहीत. कोणत्याही मुद्द्याला धरून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. मी आणि नेहमी देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी नेहमी बोलत असतो. त्या थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो, असं मला वाटतं.

‘चाटूगिरीचा उत्सांग’ म्हणत आमदार नितेश राणेंनी पुन्हा राऊतांना डिवचलं

काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बोलून दाखवलं होतं. तेव्हा त्या भाजपात नाराज असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपली उद्वीग्नता बोलून दाखवली. एका कार्यक्रमात बोलतांना त्या म्हणाल्या की, मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझी आहे. मी घाबरत नाही. मी कशालाही घाबरत नाही. निर्भयता आमच्या रक्तातच आहे. मला कशाचीही चिंता नाही, काळजी नाही. काहीच नाही मिळालं तर ऊस तोडायला जाईन. आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. आपल्याला जीवनात कोणत्याही गोष्टीची लालसा, इच्छा नाही, असं त्या म्हणाल्या.

भाजपमधील इनकमिंगविषयी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, आमचा पक्ष हा अरबी समुद्रासारखा महासागर आहे. या महासागरात कितीही लहान असो, कितीही मोठा असो, कोणत्याही पक्षातला नेता आला तरी आमच्याकडे खूप स्पेस आहे. ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये जायचे आहे, त्यांनी नक्की भाजपमध्ये प्रवेश करावा, आम्ही त्यांना समुद्राप्रमाणे सामावून घेऊ, असं बावनकुळे म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube