हनीट्रॅप प्रकरणी पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाला(DRDO) एटीएसकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालक हनीट्रॅपमध्ये अडकला असल्याने पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याचा संशय एटीएसकडून ठेवण्यात आला आहे.
दोन खासदार आणि दोन आमदारांच्या कामांसाठी एकनाथ शिंदेंनी घेतली खास बैठक
डीआरडीओ संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
संचालकाने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करुन एटीएसने त्यांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वीच देशभरातील अनेकजण हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये पुण्यातल्या लोकांचा समावेश होता. हनीट्रॅपप्रकरणी पुणे सायबर पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पुण्यात एकच खळबळ उडाली होती.
व्यायाम योगा करा, वाढलेल्या ढेऱ्या कमी करा, नाहीतर..; ओमराजेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावलं
आता संरक्षण खात्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याचंही नाव हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोशल मीडियाद्वारे मैत्री करून हनीट्रॅपमध्ये गुंतवायचं आणि ब्लॅकमेल (Blackmail) करत पैसे उकळायचे, अशा पद्धतीने लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे.
राम शिंदेंच्या तक्रारीनंतर रोहित पवारांना मोठा दणका; ठोठावला लाखोंचा दंड
राज्यातील विविध जिल्ह्यांत या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले असून नागरिकांनी वेळीच सावध व्हा, असा इशारा सायबर पोलिसांकडून देण्यात आला आहे.