राम शिंदेंच्या तक्रारीनंतर रोहित पवारांना मोठा दणका; ठोठावला लाखोंचा दंड
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदरा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याला दंड ठोठावण्यात आला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रोहित पवारांच्या कारखान्याला साडे चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी कारखाना सुरू झाला नसताना गाळप केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.
बारामती ॲग्रो साखर कारखान्याने शिफारशींचे उल्लंघन करून सहकार विभागाच्या परवानगीशिवाय साखर कारखान्याचे गाळप सुरू केले आहे, असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला होता. १९८४ च्या खंड ६ चे हे उल्लंघन आहे, असे राम शिंदे यांचे म्हणणे होते. त्यावर साखर आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
राम शिंदेंच्या तक्रारीनंतर बारामती ॲग्रो या कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुदतपूर्व गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी कारखान्याचे संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम ११८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यात २०२२-२३ या वर्षाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याची शिफारस मंत्री समितीने केलेली होती. परंतु, बारामती ॲग्रो कारखान्याने शिफारशीचे उल्लंघन केल्याचे उघड झाले होते.
Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
दरम्यान, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना राम शिंदे यांनी १० ऑक्टोबर २०२२ रोजीच पत्राद्वारे तक्रार केली होती. शिंदे यांच्या या तक्रारीवरुन प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो कारखान्याला भेट देऊन पाहणी केली होती. तसंच सहकार विभाग आणि साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला होता. त्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात बरेच राजकारण तापले होते. तेव्हा बरेच आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.