व्यायाम योगा करा, वाढलेल्या ढेऱ्या कमी करा, नाहीतर..; ओमराजेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावलं

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar : वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगा करा. हे जर शक्य नसेल तर राजीनामा देऊन टाका,अशा शब्दांत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी अधिकाऱ्यांना भर बैठकीत फटकारले. खासदार ओमराजे यांनी आज पोकरा योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून ते म्हणाले, बीपी शुगरवाल्यांनो जरा व्यायाम योगा करत आणि नाही जमत तर राजीनामा द्या.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत विविध योजनांचा आढावा खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी घेतला.

निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कृषी पर्यवेक्षक जी. एस. सगर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या निधनाची माहिती संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार निंबाळकर यांना दिली. त्यावर त्यांनी दुःख व्यक्त करत अधिकाऱ्यांनी आपल्या तब्बेतीसाठी आपली वाढलेली ढेरी कमी करावी म्हणून योगा आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला.

या योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यासह राज्यात 65 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या योजनेतून शेती सिंचन, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध औजारांसाठी अनुदान दिले जाते. यासाठी खासदारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर सुमारे तीन हजार प्रस्ताव निकाली काढण्यात येऊन शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले.

अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले

जिल्ह्यात आणखी 3 हजार 727 प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. त्यापैकी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे 3129 व अन्य प्रस्ताव 598 इतके आहेत. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हे प्रस्ताव वेगवेगळ्या टेबलांवर 5 हजार 977 प्रस्ताव धूळखात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनह अनुदान मिळालेले नाही.

ही बाब लक्षात आल्यानंतचर खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्रलंबित प्रस्ताव सात दिवसांच्या आत निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.

Tags

follow us