Medicine Dealer Strike :ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला! देशभरातले ‘केमिस्ट’ आज संपावर…

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील केमिस्ट आज संपावर गेले आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलायं.

Untitle (17)

Untitle (17)

Medicine Dealer Strike : देशात सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून आज 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आलीयं. या बंदमध्ये देशातील दीड लाख केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट (Medicine Dealer ) असोसिएशन सहभागी होणार असून औषधे विक्रेत्यांच्या समस्यांकडे वेळोवेळी निवदने देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे उद्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून बंद हाक देण्यात आली असल्याची माहिती असोशिएशनचे पीआरओ विजय पाटील यांनी दिली आहे.

देशभरातील केमिस्ट यांनी आज आपले दुकाने बंद ठेऊन रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसून येत आहे. कोरोना काळात दिलेल्या ऑनलाईन विक्रीमुळे नागरिकांना गर्भपाताच्या नशेच्या गोळ्या घरपोहोच दिले जात असल्याचा आरोप केमिस्ट संघटनेकडून करण्यात आला आहे.त्यामुळे सरकारने ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, बनावट औषधांची विक्री तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी केमिस्ट संघटनेकडून करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणात नॉन क्रिमेलिअरची मर्यादा थेट 15 लाखांवर, 43 नव्या जातींच्या समावेशाची शिफारस

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आज 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कार्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषध यावर कारवाई करा या मागण्यासाठी हा बंद पाळण्यात येत आहे.

पीडीएफ दाखविले, एआयचा वापर; प्राध्यापकामुळेच NEET पेपरफुटीचे कांड उघडकीस आलं

विधानपरिषदेच्या जागेवरून तटकरे-गोगावले पुन्हा भिडणार; दोघांकडूनही मुलांसाठी फिल्डिंग पण भाजप किंगमेकर

जवळपास देशातील दीड लाख केमिस्ट या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पी आर ओ विजय पाटील यांनी स्पष्ट केलंय. ऑल इंडिया केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने औषधे विक्रेत्यांच्या विविध महत्वाच्या समस्यांवर वेळोवेळी निवेदने देऊन अथवा प्रत्यक्ष भेटी घेऊन ही तोडगा न निघाल्यामुळे हा देशव्यापी एकदिवसीय बंदचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version