पीडीएफ दाखविले, एआयचा वापर; प्राध्यापकामुळेच निट पेपरफुटीचे कांड उघडकीस आलं
NEET-UG 2026 Leak-नीटची परीक्षा संपल्यानंतर सूथार हे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण करत होते. तेव्हा त्यांना गेस पेपर आणि परीक्षेचा पेपरबाबत शंका आली.
NEET-UG 2026 Leak: नीट पेपरफुटीप्रकरणात (NEET-UG 2026 Leak) सीबीआयने (CBI) अनेक बडे मासे पकडले आहे. यात पेपर सेट करणारे पुणे, लातूरमधील प्राध्यापक, आरसीसी कोचिंग क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक झालेली आहे. या पेपर फुटीप्रकरणी सीबीआय वेगळ्या लिंक शोधत आहेत. पण पेपर लिकचा झाल्याचा संशय राजस्थानमधील सीकर येथील गुरुकृपा कोचिंग सेंटर रसायनशास्त्राचे शिक्षक शशिकांत सुथार (Shashikant Suthar) यांना आला. तिथूनच एनटीएकडे हे प्रकरण गेले आणि सीबीआयची एन्ट्री झाली. त्यानंतर पेपर फुटीचे पाळेमुळे शोधले जाता आहेत.
3 मे रोजी नीटचा परीक्षा संपल्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण करत होते. तसेच प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करत होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने केमिस्ट्रीच्या प्रश्नांची एक गेस पेपरची पीडीएफ दाखविली. त्यांनी त्या पीडीएफमधील 45 प्रश्न आणि NEET-UG च्या प्रश्नपत्रिकेशी जुळवून पाहिले. त्यावेळी सूथार यांना धक्का बसला. कारण ते सर्व 45 प्रश्न तंतोतंत जुळत होते. याशिवाय जीवशास्त्राच्या प्रश्नांची आणखी एक पीडीएफ देखील तपासण्यात आली. एका शिक्षकाच्या मदतीने त्या पीडीफमधील 90 जीवशास्त्र प्रश्न परीक्षेतील प्रश्नांशी जुळले होते. त्यांनी यासाठी एआयचा वापर केलाय. त्यात गेस पेपर आणि रसायनशास्त्राचे प्रश्न तंतोतंत जुळले होते.
सूथार पोलिस ठाण्यात गेले पण
त्याच रात्री सूथार व काही जण उद्योगनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. पोलिस अधिकाऱ्याला सूथार हे प्रकरण समाजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अधिकाऱ्याने लेखी तक्रार देण्यास देण्यास सांगितले. याला वेळ लागत होता आणि आधीच रात्री उशीरा झाला होता. त्यानंतर सूथार यांनी थेट एनटीएशी ((National Testing Agency) संपर्क केला. पेपरफुटीबाबत सर्व माहिती दिली. त्यानंतर काही तासानंतर सीबीआयचे अधिकारी सूथार यांना भेटायला गेली. त्यानंतर पुढे सीबीआय आणि राजस्थानमधील स्पेशल ऑपरेशन चौकशी सुरू केला, असा दावा सूथार यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केलाय.
कोण आहेत सूथार ?
सूथार हे राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील नोहर गावचे आहेत. ते राजस्थानमधील सीकर येथील गुरुकृपा कोचिंग सेंटरमध्ये अनेक वर्षांपासून रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. याचबरोबर सूथार यांनी एकृ दावा केलाय. ते म्हणतात शिक्षण विभागाने पुढील वर्षापासून नीट परीक्षेसाठी वापरण्यात येईल असे सांगितलेली संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धत पूर्णपणे सुरक्षित नाही. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांप्रमाणेच नीट परीक्षा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांत घेतली जावी.
आतापर्यंत नऊ जणांना अटक
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा आणि बिहारमध्ये लिंक शोधल्या आहेत. तर सीबीआयने आतापर्यंत नऊ जणांना अटक केलीय. नांदेड, लातूर, पुणे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.