बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी बंद…

बेकायदेशीर ऑनलाईन औषधे विक्रीविरोधात अखिल भारतीय औषधे विक्रेता संघटनेकडून उद्या 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आलीयं.

Untitle (10)

Untitle (10)

Medicine Dealer : देशात सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून उद्या 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आलीयं. या बंदमध्ये देशातील दीड लाख केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट (Medicine Dealer ) असोसिएशन सहभागी होणार असून औषधे विक्रेत्यांच्या समस्यांकडे वेळोवेळी निवदने देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे उद्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून बंद हाक देण्यात आली असल्याची माहिती असोशिएशनचे पीआरओ विजय पाटील यांनी दिली आहे.

मोठी बातमी ! पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात, बारा जणांचा जागीच मृत्यू

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कार्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषध यावर कारवाई करा या मागण्यासाठी हा बंद पाळण्यात येणार आहे. या बंद मध्ये सांगली जिल्हयातील सर्व औषध विक्रेते १९ मे रोजी रात्री १२ वाजले पासून २० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून सहभागी होणार आहेत.

बीडच्या आष्टीत बांधकाम विभागाचा तुघलकी कारभार; अतिक्रमण सांगून 21 गाळे पाडले, मेहबुब शेख आक्रमक

जवळपास देशातील दीड लाख केमिस्ट या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पी आर ओ विजय पाटील यांनी स्पष्ट केलंय. ऑल इंडिया केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने औषधे विक्रेत्यांच्या विविध महत्वाच्या समस्यांवर वेळोवेळी निवेदने देऊन अथवा प्रत्यक्ष भेटी घेऊन ही तोडगा न निघाल्यामुळे हा देशव्यापी एकदिवसीय बंदचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; धार्मिक पर्यटनाला चालना, परिसराच्या विकासाला मिळणार गती

दरम्यान, या बंदच्या दिवशी देखील आपत्कालीन औषधे मिळण्यासाठीची व्यवस्था केमिस्ट असोसिएशनने व्यवस्था केली असून यासाठी तालुकानिहाय पदाधिकारी नेमले आहेत.

Exit mobile version