Download App

चार लाख गुंतवणूकदारांना दिलासा! ज्ञानराधाच्या कुटे विरोधात ईडीचे आरोपपत्र, पैसे परत मिळण्याची शक्यता

ED chargesheet against Dyanradha Mltistate Scam : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी (Dyanradha Mltistate Scam) घोटाळा ईडीकडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. न्यायालयात मल्टिस्टेटच्या विविध जिल्ह्यांत 52 हून अधिक शाखा आहेत. यात तब्बल 2,467 कोटी रूपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणी ईडीने (ed) गुन्हा दाखल केलाय. सुरेश कुटेसह इतर 24 आरोपींवर गुन्हा दाखल करून, त्या दिशेने सध्या ईडीचा तपास सुरू आहे.

मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे (Suresh Kute)यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आलीय. प्रकरणी आतापर्यंत बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे याचबरोबर नवी मुंबईत देखील छापे टाकण्यात आले होते. ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरण हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संबंधित आहे.

धक्कादायक, पुण्यात महिलेकडून अफूची शेती, पोलिसांची थेट शेतात धाड अन्…

ज्ञानराधाच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत 52 हून जास्त शाखा होत्या. यामध्ये तब्बल 2,467 कोटी रूपयांचा घोटाळा झालाय. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार या पतसंस्थेचे ब्रॅंड अंबेसेडर होते. सुरेश कुटे आणि त्यांची सहकारी मंडळी (Fraud) असे एकुण 14 जण या प्रकरणात आहेत. गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांचा परतावा देण्याच्या नावाखाली.. त्यांनी वैयक्तिक कर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी अशा घबाडातून हे पैसे जमा केलेत.

यामध्ये व्यापारी, सर्वसामान्य नोकरदार फसले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांमधील लोकांची संख्या जास्त आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. दोन एक वर्षापूर्वी यामध्ये काहीतरी घोळ आहे, असं लक्षात यायला लागलं. त्यामुळे गुंतवणूक अस्वस्थ झाले होते. यामुळे 15 ते 20 लोकांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याचं देखील समोर आलं होतं. डीच हजार कोटी रूपयांचा हा घोटाळा कसा झाला? कुणी काय भूमिका बजावली? यासोबतच गुंतवणूकदारांना किती पैसे परत मिळतील? याचे देखील तपशील आता ईडीच्या दोषारोप पत्रात आले आहेत.

पुण्यात ‘बुलेट’राजांना वाहतूक पोलिसांचा दणका, 1 हजार 768 सायलेन्सरवर थेट बुलडोझर फिरवला

वेगवेगळ्या ठिकाणी सुरेश कुटे याने साथीदारांकडून 1300 ते 1400 कोटी रूपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आलीय. हा पैसा न्यायालयीन प्रक्रियेनंतर गुंतवणूकदारांना परत मिळू शकतो. ही मोठी दिलासादायक बातमी आहे. ईडीच्या दोषारोप पत्रासोबतच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नऊ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होते.
सुरेश कुटेंनी गुंतवणूकदारांचा पैसा हा ज्ञानराधाच्या इतर कामांत गुंतवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली. या दोषारोप पत्रामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात पैसे परत मिळण्याची आशा दिसू लागली आहे. केंद्र सरकारने देखील या विषयाची दखल घेतली होती. लिक्विडेटर देखील नेमले होते. ज्ञानराधामुळे मराठवाड्यात मधल्या काळात आत्महत्येचं लोण देखील पसरलं होतं.

माधुरी दिक्षीत, सचिन पिळगांवकर हे ज्ञानराधाचे ब्रॅंड अंबेसेडर होते. सुरुवातीच्या काळात ज्ञानराधाच्या या व्यवसायाची ब्रॅंडिंग करत असताना त्यांना या गोष्टीची कल्पना असण्याची शक्यता नव्हती. परंतु मधल्या काळात ज्या मंडळीने ब्रांडिंग केलं होतं, त्यांच्यावर काही करता येवू शकतं का? महत्वाचं म्हणजे ज्ञानराधाच्या माध्यमातून जो पैसा वळवलेला आहे. त्यातून तेल उद्योग आणि तत्सम गोष्टी केलेल्या आहेत. यामध्ये अजून काही गुंतवणूकदार होते का, याचाही तपशील येणं बाकी आहे. परंतु ईडीचं दोषारोप पत्र दाखल झाल्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील, अशी आशा आहे.

 

follow us