Download App

Bacchu Kadu : अयोध्येतून थेट जरांगेंजवळ कसे पोहचले? CM शिंदेंचे हनुमान कसे ठरले?

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे दुसरे उपोषण हे सरकारसाठी अत्यंत नाजूक गोष्ट झाली होती. ते नेमके हाताळायचे कसे हेच सरकारपुढे मोठे कोडे होते. लाठीचार्ज झाल्यामुळे पहिले उपोषण संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आणि आंदोलनाला ताकद मिळाली. तर दुसऱ्या उपोषणावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव वाढवत पाणीही सोडून दिले होते. त्यांची तब्येत खालावत चालेली पाहुन मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक आक्रमक पवित्र्यात होते. त्याचवेळी ते मराठा आरक्षणाशिवाय उपोषण सोडण्यासाठीही तयार नव्हते.

त्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवायचे कसे हा मोठा प्रश्न शिंद सरकारसमोर होता. मात्र त्यांच्या मदतीला धावून आले माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे बच्चू कडू. आमदार कडू यांनी जरांगे पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, ते तब्बल दीड दिवस तळ ठोकून होते. पण ते मुख्यमंत्री शिंदेंसाठी संकटमोचक कसे ठरले? ते अंतरवाली सराटीमध्ये कसे पोहचले? हा प्रश्न होता. याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर आमदार कडू यांनी दिले आहे. ते मुंबई तकशी बोलत होते. (Efforts of MLA Bachchu Kadu, Maratha reservation protestor Manoj Jarange Patil called off his fast)

‘व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई’; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

काय म्हणाले बच्चू कडू?

मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचे ऐकण्यापेक्षा त्यांनी परिस्थिती समजून घेतली हे फार महत्वाचे आहे. खरंतरं आम्ही अयोध्येत होतो आणि तिकडे युट्यूबवर एक व्हिडीओ बघितला. मग मला असं वाटलं की जरांगे साहेबांनी पाणी पिण्यासाठी तरी सुरूवात केली पाहिजे. एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा आवाज एका प्रामाणिक कार्यकर्त्यापर्यंत आला होता आणि आम्हाला सहज वाटलं की आता पाणी पिणे तरी सुरु करावं. पाणी सोडलं चांगलं होणार नाही.

अयोध्यावरून थेट सिंदखेडराजा इथे आलो राजमाता जिजाऊच्या जन्मगावी आम्ही रक्तदान केलं. रक्तदान करून 50 किलोमीटरवर जरांगे यांचे उपोषण सुरू होते. गाव बंदी होती, त्यामुळे माझे तिथे जाण्याचे नियोजन नव्हते. पण आपण जाऊ बघू काय होते, म्हणत मी कार्यकर्ता म्हणून गेलो होतो. त्यांना पाणी प्या एवढेच सांगण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर बघितलं तर ते पाण्याचा घोट पण घेता येत नव्हता. खूप त्रास होत होतो. एक अतिशय प्रमाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं आरोग्य जपलं पाहिजे एवढाच आमचा उद्देश होता.

बिहारमध्ये 75 टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर; नितीशकुमारांच्या खेळीला भाजपचाही पाठिंबा

बुधवारी रात्री भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांची पाणी पिण्यासाठी समजूत घातली. जर सेनापतीच घायाळ झाला तर पुढची लढाई कशी लढायची? असं म्हणून त्यांची समजूत घातली. त्यानंतर टिव्हीवर बातम्या आल्या, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. त्यांना सांगितलं जर निवृत्त न्यायाधीश जे समितीमध्ये काम करत आहेत, ते जर इथे आले आणि त्यांनी जरांगे यांना सांगितले तर त्यांना कायदेशीर पेच आणि अडचणी समजून सांगण्यास मदत होईल, एक विश्वासार्ह माहिती मिळेल. ती कल्पना त्यांना पटली आणि त्यांनी दोन निवृत्त न्यायाधीशांना उपोषणस्थळी पाठविले.

दुसऱ्या दिवशी निवृत्त न्यायाधीश, मुख्यमंत्री वैद्यकीय साहयत्ता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे आणि आम्ही अशा सगळ्यांनी चर्चा केली, त्यानंतर शिष्टमंडळ आले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मी काही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन तिथे गेलो नव्हतो. मी काही संकटमोचक वगैरे ठरलो नाही, मी ते श्रेयही लाटून घेणार नाही. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तिथे गेलो होतो. त्यानंतर झालेल्या चर्चांमुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, असेही यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us