Devendra Fadnvis : कोणी तक्रार केली असेल, व्हिडिओ ट्विट केला असेल तर व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एक खळबळजनक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंयं.
Bigg Boss 17: सुशांत सिंगच्या आठवणीत रडताच अंकिता ट्रोल, चाहत्यांनी टोलर्संना दिलं सडतोड उत्तर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ललित पाटील प्रकरणातल्या गोष्टी आता स्पष्ट आलेल्या आहेत. कोणी प्रोटेक्शन दिलं होतं हे सुद्धा समोर आला आहे. आता विरोधकांना बोलायला जागा नाही. व्हिडिओबद्दल कोणीही तक्रार केली असेल किंवा व्हिडिओ ट्विट केला असेल ती सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच ललित पाटील प्रकरणात विरोधकांची तोंड बंद झालेलीच आहे. उरलेली ही लवकर होतील. थोडे अजून वाट पहा. या प्रकरणात वरवरची कारवाई करून काही होणार नाही. याचा मूळ शोधून काढण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर नाही केली? आयोगाला थेट कोर्टात खेचलं
अंधारेंची पोस्ट काय?
पोलीस व्हॅन दिसत असलेला व्हिडिओ पोस्ट करत अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड”, असं सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली आहे.
पाकिटांमध्ये नेमके काय?
अंधारेंच्या या पोस्टनंतर खळबळ उडालेली असतानाच देण्यात आलेल्या या पाकिटांमध्ये नेमकं काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ज्यांना ही पाकिटं पोलिसांमार्फत व्हॅनमध्ये बसलेल्या व्यक्तींना देण्यात आल्या त्या कोण होत्या. याबाबतह अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबत पोलीस खात्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पोलीसखातं यात काय खुलासा करतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.