Video : उठा उठा देवेंद्रजी! गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली; अंधारेंकडून पुन्हा फडणवीस टार्गेट

  • Written By: Published:
Video : उठा उठा देवेंद्रजी! गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली; अंधारेंकडून पुन्हा फडणवीस टार्गेट

पुणे : ललित पाटील प्रकरण असो किंवा मराठा आरक्षणावरून बीडमध्ये घडलेली जाळपोळ असो या दोन्ही घटनांमध्ये विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांसह फडणवीसांकडे असणाऱ्या गृहखात्याच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ललित पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) एक खळबळजनक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Sushma Andhare Post Police Van Video On X)

अंधारेंची पोस्ट काय?

पोलीस व्हॅन दिसत असलेला व्हिडिओ पोस्ट करत अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड”, असं सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली आहे.

पाकिटांमध्ये नेमके काय?

अंधारेंच्या या पोस्टनंतर खळबळ उडालेली असतानाच देण्यात आलेल्या या पाकिटांमध्ये नेमकं काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ज्यांना ही पाकिटं पोलिसांमार्फत व्हॅनमध्ये बसलेल्या व्यक्तींना देण्यात आल्या त्या कोण होत्या. याबाबतह अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबत पोलीस खात्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पोलीसखातं यात काय खुलासा करतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube