Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे पहिल्या क्रमांकावर तर तानाजी सावंत दुसऱ्या स्थानी! ही आहे त्या १६ आमदारांची यादी…

Ekanath Shinde VS Uddhav Thackeray :  ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी  एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T163645.341

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 10T163645.341

Ekanath Shinde VS Uddhav Thackeray :  ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी  एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे.  ते म्हणाले की, घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकालाचे संकेत चंद्रचूड यांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. त्यामुळे आता उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर,  दुसरीकडे राजकारण्यांची धाकधूक वाढली आहे.

अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं; SC च्या निर्णयाआधी नार्वेकरांचं पुन्हा महत्त्वाचं विधान

या आमदारांवर आहे अपात्रतेची टांगती तलावर

1.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी-पांचपाखाडीचे आमदार,
2.आमदार तानाजी सावंत – भूम परंडा
3.आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड
4.आमदार यामिनी जाधव – भायखळा
5.आमदार संदीपान भुमरे – पैठण
6.आमदार भरत गोगावले – महाड
7.आमदार संजय शिरसाठ – छत्रपती संभाजीनगर पश्चिम
8.आमदार लता सोनावणे – चोपडा
9.आमदार प्रकाश सुर्वे- मागाठाणे
10.आमदार बालाजी किणीकर – अंबरनाथ
11.आमदार बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
12.आमदार अनिल बाबर – खानापूर
13.आमदार संजय रायमूलकर – मेहेकर
14.आमदार रमेश बोरनारे – वैजापूर
15.आमदार चिमणराव पाटील – एरोंडोल
16.आमदार महेश शिंदे – कोरेगाव

Exit mobile version