Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर बावनकुळे म्हणाले आहेत.
रोमान्स अन् कॉमेडीने भरपूर Do Aur Do Pyar चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय समिती ही प्रवेशाचा निर्णय घेते. एकनाथ खडसे यांची जर इच्छा असेल आणि त्यांचं जर मत असेल तर विकसित भारतासाठी आम्ही पक्ष प्रवेश करतो आहोत. आम्ही कोणाला ही नाही म्हणत नाही. मोदींसाठी कोणी येत असेल तर आम्ही नक्की विचार करू. तसेच त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे. असं यावेळी बावनकुळे म्हणाले.
सुनेत्रा पवार अन् धंगेकरांची अचानक भेट; सुसंस्कृत राजकारणाच्या पुणे पॅटर्नचा आला प्रत्यय
तसेच पुढे बावनकुळे असं ही म्हणाले की, खडसे आणि आमच्यात कुठला ही विरोध नाही. देवेंद्र फडणवीस हे खडसे यांच्या विरोधात नाही. खडसे यांना सर्वात जास्त मानाचे स्थान देवेंद्र जी यांनी दिलं आहे. त्यांच्या बद्दलचा सन्मान फडणवीस यांच्या मनामधून कमी झालेला नाही. तर यावर केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेतील. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये (BJP) परतणार अससल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. आज सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे. खडसे सोबत आल्यास भाजपला उत्तर महाराष्ट्रातील जागांवर उमेदवारांना निवडणून आणण्यास मदत होईल.