Download App

Eknath Shinde : मी तर बारा कोटींचा रेडा बघितला, शेतकऱ्यांनो तुम्ही बघितला ?

अहमदनगर : महापशुधन एक्स्पोमध्ये फिरत असताना मला एकाने एक रेडा दाखवला आणि म्हणाला की, या रेड्याची किंमत बारा कोटी आहे. मला ही किंमत ऐकून नवलच वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही पाहिलाय का बारा कोटींचा रेडा, अशी मिस्कील टिपणी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकलोळ उडाला.

अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते.

Eknath Shinde : ‘पंचामृत’ बजेटमधील प्रथम अमृत शेतकऱ्यांसाठीच! – Letsupp

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मध्यंतरी पशुधनावर लंपी आजाराचे सावट आले होते. मात्र, त्यावर राज्य सरकारने तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना लस उपलब्ध करुन दिली. राज्य सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे. राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. आम्ही सादर केलेल्या बजेटमध्ये शाश्वत शेतीला प्राधान्य दिले आहे. या पंचामृत बजेटमधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांवर कोणतेही संकट जरी आले तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे.

(227) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

Tags

follow us