Download App

Sheetal Mhatre : ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला ‘तो’ धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंचाच, शिंदे गटाकडून ठाकरेंवर हल्ला

  • Written By: Last Updated:

“ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का?” अशी खोचक टीका ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून केली आहे.

निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “कागदोपत्री धनुष्यबाण चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरीही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे.” यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये पूजला जाणारा धनुष्यबाण दाखवला होता.

हेही वाचा :ठाकरे एकटेच नाहीत, इंदिरा गांधींसारखे बलाढ्य नेतेही चिन्हाचे युद्ध हरले !

उद्धव ठाकरे यांच्या भावनिक प्रतिक्रियेला शिंदे गटाकडून उत्तर दिले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी यावरूनही उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला तो धनुष्यबाणही एकनाथ शिंदे यांनीच दिला होता. असं शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे.

शीतल म्हात्रे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का?”

दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही आज सुनावणी होणार आहे.

Tags

follow us