दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

Eknath Shinde : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या

Eknath Shinde

Eknath Shinde

Eknath Shinde : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.

या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत.

•  VTGSO – संध्याकाळी 3.30 वाजता टेकऑफ

•  VT GSH – संध्याकाळी 4.30 वाजता टेकऑफ

या दोन्ही विमानांमधून एकूण 164 प्रवासी आज संध्याकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे 84 विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता.

सहलीवर असलेल्या सदस्यांचा रंगोत्सव; एकमेकांना रंग लावून साजरी केली विजयाची होळी

“तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या 164 प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Exit mobile version