शिवसेना पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. (Shivsena) गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिंदे यांनी बंडखोर खासदारांबाबत अप्रत्यक्षपणे मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर भविष्यात मोठं काहीतरी घडणार असून ठाकरेंचे खासदार शिंदे गटात लवकरच सामील होतील, असा अंदाज लावला जात आहे.
आज समोर भगवं वादळ उठलं आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व नेते, मंत्री, उपनेते, खासदार, आमदार माझे ऐश्वर्य आहे. समोर बसलेले माझे शिवसैनिक हे माझी संपत्ती आहे. बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. मी नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण येणार, काय होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण आज हा वाघ तुमच्यासमोर उभा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत तू शांत बसला नाही तर घरात घुसून, शिवसेना नेते रामदास कदमांकडून राऊंतावर थेट वार
आज मी बघतोय की काल परवापासून कुछ कुत्ते रोज भौकं राहे है. कुत्रे झुंडीने भुंकतात. वाघ एकटाच येतो. कुभे भुंकतात टायगर शिकार करतो. आमची ही शिवसेना आहे. ही शिवसेना आज महाराष्ट्रात पाहतोय की बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. पुढे पुढे बघा काय होतंय, असे सूचक विधानही शिंदे यांनी केले.
शिवसेनाचा जन्म मराठी माणसासाठी झाला. हिंदुत्त्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोह्यांवर प्रहार म्हणजे शिवसेना, माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना असल्याचे शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून लोकांनी त्यावर उभा राहून टाळ्या वाजवल्या.
