Download App

काही लोकांना निवडणुका आल्या की मुंबई आठवते…मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यातच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी देखील विराजमान झाले. त्यांनतर या दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांना निवडणुका जवळ आल्या की मुंबई आठवते, असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

एका आयोजित कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबईतील आगामी निवडणुका व ठाकरे गटाची भूमिका यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, काही लोकांना निवडणुका आल्या की मुंबईकर आठवतात. मुंबईचे विषय आठवतात. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून मुंबईच्या प्रमुख विषयांना प्राधान्य दिले. तसेच रखडलेले प्रश्न कसे मार्गी लागतील या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित केले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आमचे सरकार हे जनतेला न्याय देण्यासाठी सत्तेत आले आहे. रखडलेला पुनर्विकास पुढे कसा घेऊन जायचा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असते. आम्ही सर्वसामान्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेत असतो.

डिहायड्रेशनसाठी घ्या हे इलेक्ट्रोलाइट फूड

मुंबईमधील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहे. यामुळे नागरिक मुंबईबाहेर जाऊ लागले आहे. यामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. मुंबई सुशोभीकरण, आरोग्याचे प्रश्न हे देखील कसे मार्गी लागतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी गुडन्यूज! फडणवीसांनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट

कायदयातील काही नियमांमुळे हे प्रकल्प रखडलेले आहे. मात्र या कामांच्या विकासासाठी कायदा बदलला पाहिजे. कारण कायदे हे कशासाठी असतात? कायदा हे लोकांच्या भल्यासाठी असतो. सरकार हे जनतेला न्याय देण्यासाठी असते यासाठी आम्ही कायद्यात देखील बदल करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

Tags

follow us