Maharashtra Cabinet Expansion Update : सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले त्यानंतर काही दिवसांनी या सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल लागला. यात शिंदे गटाला दिलासा मिळाला. या निकालानंतर शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government) सरकारचा रखडलेला विस्तार पार पडले अशी आशा दोन्ही पक्षातील इच्छूक नेत्यांना होती. मात्र, मोदी आणि शाहांच्या रडावर शिंदे गटातील पाच मंत्री असल्याने हा विस्तार रखडलेला असल्याचे सांगितले जात आहे. या पाचही मंत्र्याची पदावरून गच्छंती करण्याचे तसेच नवीन मंत्र्यांना नेमण्याचे आदेश भाजप हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. या बाबात एका वर्तमानपत्राने वृत्त प्रकाशित केले आहे. (Eknath Shinde Devendra Fadanvis Cabinet Expansion )
अमित शाहांना भेटणार म्हणताच शाह तडक नांदेडात; पंकजा मुंडे काय बोलणार?
एकनाथ शिंदेंची कोंडी
भाजप हायकमांडकडून अशाप्रकारे देण्यात आलेल्या आदेशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. सत्तांतरादरम्यान साथ दिलेल्या शिलेदारांना पदावरून हटवायचे कसे असा प्रश्न शिंदेंसमोर उभा राहिला आहे.
शिंदे गटातील मंत्री कशा प्रकारे काम करतात हे पाहण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा आहे. या यंत्रणेकडून शिंदेंचे पाच शिलेदार काम करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कामचुकार मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नवे मंत्री नेमण्याचे आदेश भाजप हायकमांडकडून देण्यात आले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल, याचा अहवाल यंत्रणेने हायकमांडला दिला आहे. त्यात शिंदेसेनेचे ५ मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले आहेत.
NCP चे संस्थापक सदस्य आता कुठे आहेत?
भाजपच्या रडावर कोणते नेते?
शिंदे गटातील पाच मंत्री भाजपच्या रडारवर आहेत. यामध्ये अपेक्षित कामे नसल्याचे गुलाबराव पाटील असून, त्यांच्याकडून ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांत सरकारविषयी नाराजीचा सूर आहे. मात्र, ठाकरे गटाकडून वेळोवेळी होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंना गुलाबराव पाटील यांची गरज आहे.
ओमराजे निंबाळकरांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; उडी मारल्यानं थोडक्यात बचावले
गुलाबराव पाटलांशिवाय तानाजी सावंत हेदेखील भाजपच्या रडावर आहेत. सावतांकडून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी कोणतीही ठोस उपायोजना करण्यात आलेली नाही. भाजपच्या रडावर असलेल्या शिंदेंच्या गटातील तिसर मंत्री म्हणजे संजय राठोड आहेत. राठोडांविरोधात भाजप समर्थक अनेक औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. याशिवाय एका मुलीच्या आत्महत्याप्रकरणाने राठोड यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. असे असताना राठोड यांना ठेवणे भाजपसाठी भविष्यात त्रासदायक ठरू शकते. केंद्राच्या कृषी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अब्दुल सत्तार फेल ठरले आहेत. त्यामुळे बळीराजा नाराज आहे. याशिवाय संदिपान भुमरे हेदेखील भाजपच्या रडारवर आहेत.