तो नराधम जिवंत राहणार नाही! नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

आम्ही तुमच्यासोबत आहोत. एवढा विश्वास ठेवा की तो आरोपी जिंवत राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना दिला आहे.

News Photo   2026 05 04T123014.814

तो नराधम जिवंत राहणार नाही! नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवरील (Pune) अत्याचार घटनेनंतर लोकांमध्ये मोठा संताप आहे. आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र, आरोपीने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुराने नसल्यानं तो 2 वेळा निर्दोष सुटला आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करुन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन दिल.

आपण एकाच परिवारातले आहोत. मी कालपासून-परवापासून एसपी, पोलीस या सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्या आरोपीला जिवंत राहायचं अधिकार नाही आणि झालेली घटना तर अतिशय दुर्दैव आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही लोक तरी स्वस्थ बसणार नाही एवढं फक्त विश्वास तुम्हाला देतो, असं एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना सांगितलं. सांत्वन करतानाही माझ्याकडं शब्द नाही. तुमच्या पोटचा गोळा गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना एकदम माणुसकीला कलंक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. एवढा विश्वास ठेवा की तो आरोपी जिंवत राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना दिला आहे.

कोंबडी, कुत्रा, शेळीवरही अत्याचार; नरसापूर प्रकरणातील नराधमाचा विकृत इतिहास समोर

Exit mobile version