जरांगे फक्त प्यादा, मराठा आंदोलनामागे एकनाथ शिंदे; गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा

Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आजपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी

Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil

Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil

Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आजपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मराठा समाजातील नेते सक्रिय असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलतान सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हा एक प्यादा आहे. तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सेवक आहे. जरांगे मुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadnavis) घराला टार्गेट करण्याची भाषा करतो तरी एकनाथ शिंदे मूग गिळून गप्प बसले आहेत. एकनाथ शिंदे नाहीतर सत्तेतील इतर मंत्री विखे पाटीलही मवाळपणे बोलतात. विखे पाटील (Vikhe Patil) यांनी कधीच जरांगे यांचा निषेध केला नाही असं माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले.

मराठा भावांना आरक्षण नको त्यांना ईडब्लूएस (EWS) आरक्षण हवे आहे असे मला अनेक कॉल्स येत आहेत असा दावा देखील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केला आहे. तर पाटील नावाची पदे संविधानमध्ये मला दिसत नाहीत. गावांमध्ये पाटील अस, तो बौद्ध किंवा आदिवासी समाजाचा असू शकतो अस देखील यावेळी सदावर्ते म्हणाले.

जात पडताळणी समिती रद्द करा; जरांगे पाटलांची मोठी मागणी

महायुतीमध्ये नाराजी

तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या या दाव्यानंतर महायुतीमध्ये देखील नाराजी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरु आहे यामागे नेमकं कोण आहे याबाबत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चर्चा सुरु झाली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर दुसरीकडे याविषयी पक्षाकडून लवकरच अधिकृत भूमिका देखील जाहीर करण्यात येणार आहे.

Exit mobile version