नाशिकची आईसारखी सेवा करू, सत्ता आमच्या हातात द्या; एकनाथ शिंदेंची नाशिककरांना ग्वाही

Eknath Shinde On Nashik Municipal Corporation Election : नाशिक महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Eknath Shinde On Nashik Municipal Corporation Election

Eknath Shinde On Nashik Municipal Corporation Election

Eknath Shinde On Nashik Municipal Corporation Election : नाशिक महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नुकतंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत नाशिककरांना शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला मतदार करण्याचे आवाहन केले होते. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये सभा घेत जर नाशिककरांनी सत्ता दिली तर नाशिकची आई सारखी सेवा करु अशी ग्वाही दिली आहे. याच बरोबर आमची सत्ता आली तर पाचशे चौरस फुटापर्यंत घरांना घरपट्टी माफ, सिडकोतील पंचवीस हजार घरे फ्री होल्ड आणि तपोवनामधील झाडे वाचवण्याचे आश्वसन एकनाथ शिंदे यांनी या सभेत बोलताना नाशिककरांना दिले.

या सभेत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, नाशिकमध्ये सत्ता मिळूनही कुठीलीच कामे मागील काही वर्षात झाली नाही. लोकांनी नाशिक दत्तक घेऊनही काहीच झाले नाही मात्र मी शब्द देतो, तुम्ही नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation Election) सत्ता आमच्या हातात द्या आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करु असं म्हणत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  तर या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आमची युती विकासासाठी झाली असं म्हणत ठाकरे बंधूंना टोला लावला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी नाशिक शहरात ठाकरे बंधूंचा सुंभमेळा भरला होता. बिस साल बाद एकत्र आले कारण तीस साल बाद काय होणार? याची त्यांना चिंता सतावते. कोणी कोणाशी युती करु द्या, नाशिककर महायुतीचा भगवा फडकणार, मनपावर फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणाले.

भारतीय संघाला मोठा धक्का, ऋषभ पंत न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर; कारण काय?

तसेच काही लोक निवडणूकीत पावसाळ्यातील छत्री प्रमाणे उगवतात. दिवसभर नेटफ्लिक्स पाहायचे, जनतेच्या प्रश्नात त्यांना कोणताही रस नाही असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. तर येणाऱ्या काळात देखील लाडकी बहीण योजना सुरु राहणार असल्याचा शब्द देखील एकनाथ शिंदे यांनी या सभेत बोलताना दिला.

Exit mobile version