खारघर दुर्घटनेनंतर CM शिंदेंनी घेतला उन्हाचा धसका; पोलीस आयुक्तांना महत्वाचे निर्देश

Eknath Shinde On Police : गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघाताने १५ जणांचे बळी गेले होते. त्यावरुन राज्यभरात बराच वाद झाला. या प्रकरणानंतर राज्यात दिवसा 12 ते 5 या दरम्यान कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेशच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त […]

Traffic Police

Traffic Police

Eknath Shinde On Police : गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघाताने १५ जणांचे बळी गेले होते. त्यावरुन राज्यभरात बराच वाद झाला. या प्रकरणानंतर राज्यात दिवसा 12 ते 5 या दरम्यान कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेशच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.

काय घडलं?

मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून दुपारच्यावेळी मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला. यावेळी त्यांनी या वयाने ज्येष्ठ असलेल्या वाहतूक पोलिसांसाठी निर्देश दिले आहेत.

Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

याशिवाय आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.

Karnataka च्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला! ‘हे’ होणार मुख्यमंत्री, शनिवारी शपथविधीची शक्यता

 

Exit mobile version