Download App

‘ 50 खोके, एकदम ओके’ : शिंदे गटाची झोप उडविणाऱ्या जगप्रसिद्ध घोषणेचा जनक कोण? वाचा सविस्तर

  • Written By: Last Updated:

Who Create 50 Khoke Ekdam Ok Slogan : बंडखोरी करून 20 जून 2022 रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूंकप माजवणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या घटनेला आज (दि. 20 ) वर्ष पूर्ण होत आहे. बंडखोरीच्या रात्रीपासून ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीं घडल्या. या सर्व घडोमोडींची संपूर्ण देशाने दखल घेतली.

पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, ना-आवडाबाई अन् ठाकरेंचे फडणवीसांच्या जखमेवर मीठ

यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर विरोधकांकडून विविध घोषणा देत शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, लहानांपासून मोठ्यापर्यंत आजही लक्षात राहिलेली घोषणा म्हणजे ’50 खोके एकदम ओके’ हीच असून, एकनाथ शिंदेंची झोप उडवणाऱ्या या घोषणेचा खरा जनक कोण? याचे उत्तर खुद्द ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी बोलताना दिले होते. राऊत यांच्या मते 50 खोके एकदम ओके ही घोषणा अबाल वृद्धांपासून सर्वांच्या तोंडी आजही कायम असणाऱ्या घोषणेचे जनक काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल असल्याचे सांगितले. त्यांच्या या घोषणेबाबत राऊतांनी गोरंट्याल यांचे कौतुकही केले होते.

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक

ठिकठिकाणांवर दिसून आल्या घोषणा

शिंदेंच्या बंडखोरीनंतर गोरंट्याल यांनी दिलेली ही घोषणा विरोधी पक्षांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्यानंतर ही घोषणा विधान भवनाच्या पायऱ्या, बैलांच्या अंगावर, हॉटेलातील थाळ्यांसह स्टेडियममधील बोर्डवरही दिसून आली होती.

‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, त्यांचं ‘तेव्हाचं’ रडणं नाटकी’; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

कुठे देण्यात आली पहिल्यांदा घोषणा

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. यावेळी गोरंट्याला यांनी मुंबईतील विधानसभेच्या पायऱ्यांवर सर्वात पहिल्यांदा ही घोषणा दिली होती.

News Arena India Survey : यशोमती ठाकूरांचा किल्ला मजबूत तर रवी राणांची जागा भाजपला

कशी सुचली घोषणा?

दरम्यान, गोरंट्याल यांनी अशा प्रकारची घोषणा सुचण्यामागे आमदार शहाजीबापू पाटील असल्याचे सांगितले जाते. शहाजी पाटील गुवाहाटीला असताना त्यांचा फोन कॉल व्हायरल झाला होता. त्यावेळी कार्यकर्त्याशी बोलताना शहाजी बापूंनी काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय असं भाष्य केले होते. यातील ओक्के शब्द गोरंट्याल यांनी हेरला आणि ओकेच्या आधी 50 खोके हा शब्द लावत ’50 खोके एकदम ओके’ या घोषणेचा उदय झाला.

20 तारखेला जागतिक खोके दिन

आदित्य ठाकरेंनी रविवारी (दि. 18) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करत, 20 जून हा जागतिक खोके दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचं म्हंटलं. ते म्हणाले होते की, २० तारखेला सर्वात महत्वाचा दिवस आहे. जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही जागतिक आहे. कारण त्यांची 33 देशांनी दखल घेतली आहे, असा हा दिवस आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना त्यांच्या लंडन प्रवासादरम्यानचा मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, परवा लंडनमध्ये होतो. तिथे एक मित्र भेटला. त्याने विचारलं की आता शिवसेनेचा पुढचा कार्यक्रम काय आहे वगैरे. त्यावर मी त्याला सांगत होतो की 18 तरखेला आमचं शिबीर आहे, १९ तारखेला वर्धापनदिन आणि २० तारखेला 50 खोके इतकं बोललो तर बाजूला एक फॉरेनर होता तो देखील म्हणाला “एकदम ओक्के’, यावर सभागृहात एकच हशा पिकला.

Tags

follow us