पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, ना-आवडाबाई अन् ठाकरेंचे फडणवीसांच्या जखमेवर मीठ

पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, ना-आवडाबाई अन् ठाकरेंचे फडणवीसांच्या जखमेवर मीठ

“अर्धवटराव हे पहिलं पात्र कुणाचं? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? त्यांची दोन पात्र होते एक अर्धवटराव आणि आवडाबाई आता ते पण दिसत नाहीत. आता ते नावडाबाई झाले आहेत”, असं म्हणतं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धवटराव या टीकेवर पलटवार केला. ते शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेनंतर बोलत होते. दरम्यान, या टीकांमुळे महाराष्ट्रात रामदास पाध्ये यांची सुप्रसिद्ध बोलक्या बाहुल्यांची पात्र चर्चेत आली आहेत. (Shivsena UBT Chief Uddhav Thackeray criticized DCM Devendra Fadnvais on covid vaccine)

यावेळी ठाकरे म्हणाले, मोदींनी कोरोनावरली लस बनविण्याची दावा करणारी फडणवीसांची एक क्लिप मी दाखवली. पण ते असं बोलतील यावर मला विश्वास बसत नव्हता. मोदींनी लस तयार केसी नसती तर? मला नाही वाटत मोदी देखील असं कधी बोलले असतील. त्यावर देवेंद्र फडणवीस मला ‘अर्धवटराव’ बोलले. अर्धवटराव हे पहिलं पात्र कुणाचं? रामदास पाध्येंनी हे पात्र आणलं. आता ते मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? त्यांचे दोन पात्रं होते. एक अर्धवटराव आणि आवडाबाई! आता ते पण दिसत नाहीत. आता ते नावडाबाई झाले आहेत. मोदींनी लस तयार केली या वाक्याला काही अर्थ आहे का? तुम्ही कोणत्या जगात राहत? आहात लोकांना मूर्ख का समजता?, असा सवाल ठाकरे यांनी फडणवीसांना केला.

News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ‘यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का? संशोधक गवत उपटत होते का? सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू असे म्हणल्यानंतर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं ते ठरवावं लागेल, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला होता.

Adipurush : ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनची ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

यावर बोलताना फडणवीस यांनी ठाकरेंची अर्धवटराव असा उल्लेख करत टीका केली होती. ट्विटरवर एक व्हीडिओ ट्विट करत ते म्हणाले होते, “अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका… याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला… म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला!”, असे म्हंटले.

याचवरुन आता ठाकरेंनी रामदास पाध्ये यांच्या आवडाबाई या बोलक्या बाहुल्याच्या पात्राचा संदर्भ देत ठाकरे यांनी फडणवीसांना नावडाबाई अशी उपमा दिल्याचे दिसून येत आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले, या त्यांच्या जखमेवर शाब्दिक कोट्यांसाठी ओळखले जाणाऱ्या ठाकरेंनी मीठ चोळले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube