Download App

काँग्रेसचरणी लीन झालेल्या… उबाठाला माफ करा! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिंदेंच्या शिवसेनेचे हटके आंदोलन

Shinde Shiv Sena Protest At Balasaheb Thackeray Memorial : हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली, तर काय होतं? हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत आज शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ( Balasaheb Thackeray Memorial) प्रतिकात्मक आंदोलन केले. बाळासाहेब उबाठाला (Uddhav Thackeray) माफ करा, सडका मेंदू साफ करा, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून (Eknath Shinde Shiv Sena) करण्यात आली.

या आंदोलनात शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या सुशीबेन शहा, महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला.

‘साकळाई’ला महिनाभरात प्रशासकीय मान्यता अन् भूमिपूजन; सुजय विखेंनी सांगितला प्लॅन, लकेंनाही टोला

शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाठाची अवस्था

शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या की, उबाठाची काय गत झाली? काय अवस्था झाली, हे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आले. शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाठाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही, म्हणून त्यांची माफी मागायला आलो, असे त्या म्हणाल्या. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात असून जनता त्यांच्या मागे आहे, असे त्या म्हणाल्या. जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे, ते आता सोफ्यावर बसतात असे त्या म्हणाल्या.

‘कंतारा : चॅप्टर 1’मध्ये रुक्मिणी वसंतची दमदार एन्ट्री! कणकवतीच्या लुकने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत जाऊन सरपटले

उध्दव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाहीत, झुकले नाहीत तर सरपटले, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. त्यांनी उबाठा सेना सोनिया गांधी यांच्या पायावर टाकली. शिवसेना भाजप युतीमध्ये असताना अमित शाह पण मातोश्रीवर येऊन गेले होते. आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता, अशी टीका म्हात्रे यांनी यावेळी केली.

 

follow us