आव्वाज कुणाचा? राज्यातील तब्बल ४७ मतदारसंघांत शिवसेना VS शिवसेना सामना..

या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Eknath Shinde

Eknath Shinde

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता. १५ जागी उमेदवार देऊन  शिंदेंनी ७ खासदार निवडून आणले होते. यातील बहुतांश लढती या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांबरोबरच झाल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीचा दुसरा अंक सुरू झाला आहे. या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या उमेदवारांच्या रुपात खरी लढत एकनाथ  शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होणार आहे. दरम्यान, आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे.  ही मुदत संपल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मनसेचं ठरलं, CM शिंदेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही; राजकीय ट्विस्टचं कारण..

मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. जवळपास १० हजार ८९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ४७ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. या मतदारसंघांतही स्ट्राईक रेट कुणाचा चांगला राहिल. कुणाच्या पाठीमागे जनाधार आहे याची चर्चा होणार आहे.

कोणत्या मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना

सांगोला

शहाजी बापू पाटील (शिंदे गट)
दीपक साळुंखे (ठाकरे गट)

पाटण

शंभूराज देसाई (शिंदे गट)
हर्षद कदम (ठाकरे गट)

परांडा
तानाजी सावंत (शिंदे गट)
राहुल पाटील (ठाकरे गट)

चोपडा
चंद्रकांत सोनवणे (शिंदे गट)
राजू तडवी (ठाकरे गट)

बुलढाणा
संजय गायकवाड (शिंदे गट)
जयश्री शेळके (ठाकरे गट)

मेहकर
संजय रायमूलकर (शिंदे गट)
सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)

सिल्लोड
अब्दुल सत्तार (शिंदे गट)
सुरेश बनकर (ठाकरे गट)

बाळापूर
बळीराम शिरसकर (शिंदे गट)
नितीन देशमुख (ठाकरे गट)

पालघर
राजेंद्र गावित (शिंदे गट)
जयेंद्र दुबळा (ठाकरे गट)

रामटेक
आशिष जैस्वाल (शिंदे गट)
विशाल बरबटे (ठाकरे गट)

कळमनुरी
संतोष बांगर (शिंदे गट)
संतोष टारफे (ठाकरे गट)

परभणी
आनंद भरोसे (शिंदे गट)
राहुल पाटील (ठाकरे गट)

कन्नड
संजना जाधव (शिंदे गट)
उदयसिंह राजपूत (ठाकरे गट)

औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट (शिंदे गट)
राजू शिंदे (ठाकरे गट)

जोगेश्वरी पूर्व
मनीषा वायकर (शिंदे गट)
अनंत नर (ठाकरे गट)

पैठण
विलास भुमरे (शिंदे गट)
दत्ता गोर्डे (ठाकरे गट)

वैजापूर
रमेश बोरनारे (शिंदे गट)
दिनेश परदेशी (ठाकरे गट)

नांदगाव
सुहास कांदे (शिंदे गट)
गणेश धात्रक (ठाकरे गट)

बोईसर
विलास तरे (शिंदे गट)
विश्वास वळवी (ठाकरे गट)

भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (शिंदे गट)
महादेव घाटळ (ठाकरे गट)

कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिंदे गट)
सचिन बासरे (ठाकरे गट)

अंबरनाथ
बालाजी किणीकर (शिंदे गट)
राजेश वानखेडे (ठाकरे गट)

कल्याण ग्रामीण
राजेश मोरे (शिंदे गट)
सुभाष भोईर (ठाकरे गट)

ओवळा माजीवडा
प्रताप सरनाईक (शिंदे गट)
नरेश मणेरा (ठाकरे गट)

कोपरी पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (शिंदे गट)
केदार दिघे (ठाकरे गट)

मागाठाणे
प्रकाश सु्र्वे (शिंदे गट)
उदेश पाटेकर (ठाकरे गट)

भायखळा
यामिनी जाधव (शिंदे गट)
मनोज जामसूतकर (ठाकरे गट)

विक्रोळी
सुवर्णा करंजे (शिंदे गट)
सुनील राऊत (ठाकरे गट)

भांडूप पश्चिम
अशोक पाटील (शिंदे गट)
रमेश कोपरगावकर (ठाकरे गट)

दिंडोशी
संजय निरुपम (शिंदे गट)
सुनील प्रभू (ठाकरे गट)

अंधेरी पूर्व
मुरजी पटेल (शिंदे गट)
ऋतुजा लटके (ठाकरे गट)

चेंबूर
तुकाराम काते (शिंदे गट)
प्रकाश फातर्पेकर (ठाकरे गट)

कु्र्ला
मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
प्रविणा मोरजकर (ठाकरे गट)

माहिम
सदा सरवणकर (शिंदे गट)
महेश सावंत (ठाकरे गट)

वरळी
मिलींद देवरा (शिंदे गट)
आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

कर्जत
महेंद्र थोरवे (शिंदे गट)
नितीन सावंत (ठाकरे गट)

महाड
भरत गोगावले (शिंदे गट)
स्नेहल जगताप (ठाकरे गट)

नेवासा
विठ्ठलराव लंघे (शिंदे गट)
शंकरराव गडाख (ठाकरे गट)

उस्मानाबाद
अजित पिंगळे (शिंदे गट)
कैलास पाटील (ठाकरे गट)

बार्शी
राजेंद्र राऊत (शिंदे गट)
दिलीप सोपल (ठाकरे गट)

दापोली
योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (ठाकरे गट)

गुहागर
राजेश बेंडल (शिंदे गट)
भास्कर जाधव (ठाकरे गट)

रत्नागिरी
उदय सामंत (शिंदे गट)
सुरेंद्रनाथ माने (ठाकरे गट)

राजापूर
किरण सामंत (शिंदे गट)
राजन साळवी (ठाकरे गट)

कुडाळ
निलेश राणे (शिंदे गट)
वैभव नाईक (ठाकरे गट)

सावंतवाडी
दीपक केसरकर (शिंदे गट)
राजन तेली (ठाकरे गट)

राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिंदे गट)
के. पी. पाटील (ठाकरे गट)

Exit mobile version