एकनाथ शिंदे यांचे मोठे स्वप्न : भाजप-सेना युती विधानसभेच्या 200 जागा जिंकणार

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission)निकालानंतर शिवसेनेची (Shivsena) पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सेना […]

Eknath Shinde

Eknath Shinde

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission)निकालानंतर शिवसेनेची (Shivsena) पहिली कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सेना युतीच्या जवळपास 200 जागा जिंकणार असल्याचा निश्चय केला आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (Shiv Sena National Executive) बैठकीत आणखी काही ठराव करण्यात आले. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतेपदी निवड, एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार, 1998 साली बाळासाहेबांनी केलेल्या घटनेनुसारच पक्षात काम चालणार आहे. कार्याध्यक्ष आणि पक्षप्रमुख ही पदं मोडीत काढण्यात आली आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आज राज्यभर चक्काजाम आंदोलन

त्याचबरोबर कोणाच्याही संपत्तीवर, अकाऊंटवर आणि मालमत्तेवर आमचा अधिकार दाखवणार नाही, चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणं, सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना 80 टक्के नोकरीमध्ये स्थान देणार, मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा देणे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकरकर यांना भारतरत्न देणे, UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे. जिल्हानिहाय स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रे, गड किल्ले संवर्धन करणे.

निवडणूक आयोग नियमांचं पालन करण्याचा ठराव, राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करावा अशा पद्धतीनं काही ठराव करण्यात आले.

Exit mobile version