Download App

कुणाल कामराच्या गाण्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले?, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही विडंबन करू शकता. ते आम्ही समजतो. मात्र, त्यामध्ये व्यभिचार, स्वयराचार आणि सुपारी

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde on Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने गायलेल्या गाण्यानंतर शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली. (Kamra) या प्रकरणावर सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सुपारी घेऊन बोलण्याचे काम

सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही विडंबन करू शकता. ते आम्ही समजतो. मात्र, त्यामध्ये व्यभिचार, स्वयराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचे काम या माणसाने केले आहे. मी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. याच माणसाने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, अर्णब गोस्वामी, उद्योगपतींबद्दल काय विधाने केली आहेत? ते पाहा. हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मी बोलणार सुद्धा नाही. मी काम करणारा माणूस आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते बीबीसी या वाहिनीवर आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

राज्यात चाललंय काय? शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्तीने भर रस्त्यात चोपलं

मी आरोपांवर प्रतिक्रिया देतच नाही. तीन वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोकं झाडत होते. मी नेहमी सांगायचो की, आरोपांना मी कामाने उत्तर देणार आहे. आरोपांना आरोपाने उत्तर द्यायला लागलो, तर आपला फोकस बदलतो. आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिलं. त्यामुळे जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. 80 पैकी 60 जागा आम्हाला मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 20 जागा निवडून आणता आल्या.

अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन असते

तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड योग्य आहे का? या प्रश्नावर बोलताना म्हणाले मी तोडफोडीचे समर्थन करत नाही. मात्र, समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो. हे जे घटलं ते अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते. मी संवेदनशील आहे. मला सहन करण्याची खूप ताकद आहे. मी कुणालाही बोलत नाही. शांत राहणे, काम करणे, कामावर फोकस केंद्रीत करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम मी करतो. त्यामुळेच देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

follow us