चोर आणि गद्दार एकनाथ शिंदे…कुणाल कामरा यांनी का माफी मागावी? आदित्य ठाकरे यांचा सवाल

Aditya Thackeray Full Support To Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बनवलेला व्हिडिओ वादात सापडला आहे. यावरून शिवसैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. कामरावर गुन्हा देखील दाखल झालाय. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackeray) स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) पाठिंबा दिलाय.
आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की, चोर, गद्दार हे शब्द कवितेत बोलले आहेत. चोर टोळीनं कधी ठरवलं की, ते एकनाथ शिंदेच आहे. सापाशी तुलना त्यांच्या खासदाराने केली आहे. ही तोडफोड केल्याने इन्टरनॅशनल कॉन्सर्ट येणार आहेत का, असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी केलाय. कार्यकर्त्यांनी सिद्ध केलंय चोर आणि गद्दार एकनाथ शिंदे आहेत. मी म्हस्केंचा निषेद्ध करतो, त्यांनी सापाशी तुलना करायला नको हवी होती असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
Video : गाण्यात कोणताही दोष नाही, जे गद्दार ते गद्दारच; ठाकरेंचा कुणाल कामरला फुल्ल पाठिंबा
आदित्य ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा दिसतंय खासदार धमकी देत आहेत, तालिबान जशी धमकी द्यायचे तसं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर आपण बोलतोय. अंडरलाईन गृहविभाग होतं आहे. भाजपच्या वरीष्ठांना एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवायचं आहे की, देवेंद्र फडणवीस कार्यक्षम नाहीत.
मुख्यमंत्री टपोरीगिरीवर रोख लावणार आहेत की नाही, हा देखील सवाल आहे. सुपारी वगैरीची गरज नाही. कुणाल कामराने आमच्यावर देखील टीका केली आहे. काल देखील मोदींवर कामराने टीका केली आहे. मात्र, अशी प्रतिक्रिया कोणाची आलेली नाही.
नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा संतप्त प्रश्न
मुख्यमंत्र्यांनी डोळे उघडून बघावं त्यांना अंडरलाइन कोण करतंय. अर्बन नक्षल शब्द आला असेल, तर सरकार हे चालवू शकत नाही आहे असंच दिसतंय. सरकार चालवू शकले नाही की डावे, माओवादी, अर्बन नक्षल सारखे मुद्दे काढले जातात. कुणाल कामरा यांनी का माफी मागावी? गद्दार आणि चोर जर एकनाथ शिंदेच असतील तर कामराने नक्कीच माफी मागावी, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.