Leopard Attack In Ahilyanagar : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू ; ग्रामस्थांचा वन विभागावर संतापाचा भडका

Leopard Attack In Ahilyanagar : पारनेर तालुक्यातील किन्ही गावात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतात खुरपणी करत असलेल्या भागूबाई विश्वनाथ

Leopard Attack In Ahilyanagar

Leopard Attack In Ahilyanagar

Leopard Attack In Ahilyanagar : पारनेर तालुक्यातील किन्ही गावात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतात खुरपणी करत असलेल्या भागूबाई विश्वनाथ खोडदे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. भागूबाई खोडदे हरभऱ्याच्या शेतात एकट्याच काम करत होत्या. अचानक आलेल्या बिबट्याने त्यांना फरपटत नेले. शेजारच्या शेतात असलेल्या त्यांच्या पतींनी आरडाओरड करत मदत मागितली, पण तोपर्यंत सर्व काही संपले होते. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वन विभागावर ग्रामस्थांचा रोष

आम्ही आधीच सांगितलं होतं किन्ही परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा (Leopard Attack In Ahilyanagar) मुक्त वावर सुरू होता. गावकऱ्यांनी वन विभागाला पुन्हा पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वेळेत प्रतिसाद न दिल्याचा आरोप ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे यांनी केला आहे. वन विभागाचा गलथान कारभार आणि त्याची किंमत एका वृद्ध महिलेला जीवाने चुकवली,असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

नरभक्षक बिबट्या ठार करण्याची मागणी

घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी जोरात लावून धरली. पिंजरा लावला असला तरी त्या ठिकाणी भक्ष्य नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही, त्यामुळे संताप आणखी वाढला. जिल्हा उपवनसंरक्षकांनी नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बुधवार सकाळी 11 वाजेपर्यंत शार्प शूटर व आवश्यक आदेश देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

Municipal Election 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंद्यात सर्वाधिक तर श्रीरामपूरमध्ये मतदानाचा टक्का घसरला

किन्हीत भीतीचे सावट

बिबट्याला पकडण्याची मोहीम निर्णायक या घटनेनंतर किन्ही आणि बहिरोबावाडी परिसरात भीतीचं सावट आहे. महिलांना आणि शेतकऱ्यांना एकटं शेतात जाण्याची भिती वाटू लागली आहे. आता वन विभागाने निर्णायक कारवाई न केल्यास ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाला करण्याचा इशारा वन विभागाला दिला आहे.

Exit mobile version