Nilesh Lanke : ग्रामीण भागात ‘बिबट्या’च्या भीतीचे सावट…, लंकेंची महावितरणकडे महत्त्वाची मागणी

Nilesh Lanke : जिल्ह्यातील नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढत

  • Written By: Published:
Nilesh Lanke

Nilesh Lanke : जिल्ह्यातील नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढत असून, मानवी वस्त्यांतील हालचालींमुळे ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लहान मुलांवर, महिलांवर तसेच पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. अगदी शहरातही बिबट्या दिसल्याच्या घटना नोंदल्या जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

यासंदर्भात खा.नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी महावितरणला (Mahavitaran) लेखी निवेदन दिले असून शेतकऱ्यांना तातडीने दिवसापूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

रात्रीची शेती असुरक्षित

ग्रामीण भागात रात्रीच्या वेळेसच वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अपरात्री शेतात जावे लागते. वाढलेल्या बिबट्या-प्रमाणामुळे आता रात्री शेतात जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे. परिणामी पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका वाढला आहे. महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच घटक भीतीच्या छायेत दैनंदिन कामकाज करत आहेत.

पूर्ण क्षमतेने वीजपुरवठ्याची मागणी

या पार्श्वभूमीवर विविध गावांमधून महावितरणकडे दिवसा शंभर टक्के क्षमतेने व स्थिर दाबाने वीजपुरवठा मिळावा, अशा मागण्या सतत होत आहेत. बिबट्या-प्रभावित भागात दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास शेतामधील कामे सुरक्षित वेळेत पूर्ण करता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महावितरणकडे मागणी सादर

महावितरणच्या अधिकारी अभियंत्यास पाठवण्यात आलेल्या निवेदनात पुढील मुद्दे तातडीने अमलात आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. बिबट्या-प्रभावित गावांमध्ये दिवसा १००% क्षमतेने व स्थिर दाबाने वीजपुरवठा देणे, वनविभाग, पोलीस व स्थानिक संस्थांशी समन्वय साधून अशा गावांसाठी विशेष बोज योजना राबवणे, देखभाल वा इतर कारणांनी अनपेक्षित वीजव्यत्यय टाळण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करणे, जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ‘आपत्कालीन वीजपुरवठा प्रोटोकॉल’ तयार करणे.

स्मृती मानधना – पलाश मुच्छल प्रकरणात नवीन ट्विस्ट अन् धक्कादायक खुलासा; मेरी डि’कोस्टाची पहिली प्रतिक्रिया

ग्रामीण जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा

दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास बिबट्या भीतीने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, तसेच अपघात व जीवितहानीची शक्यता टाळण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महावितरणकडून तातडीची सकारात्मक कार्यवाही होण्याची ग्रामीण भागात अपेक्षा व्यक्त होत आहे.

follow us