Maharashtra Election : महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपत आलेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आालायं. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवाराला नागरिकांच्या भेटीगाठी घेता येणार आहेत. म्हणजे प्रचाराची मुदत संपली तरीही उमेदवारांना मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करता येणार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलायं. मतदान प्रक्रियेच्या 48 तास आधी प्रचाराची मुदत संपत असते, त्यानुसार आज सायंकाळी 5 : 30 वाजता प्रचाराची मुदत संपणार होती, मात्र आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचार सुरुच ठेवता येणार आहे. उमेदवारांना पत्रके वाटता येणार नाही. परंतु वैयक्तिक भेटीगाठी घेता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झेडपी, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाकडून आज घोषणेची शक्यता…
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज भरल्यानंतर जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून आज सायंकाळी 5 : 30 वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचे रोड शो, जाहीर सभा, बंद होणार आहे. मात्र, उमेदवारांना दारोदारी जाता जावून मतदारांना भेटता येणार आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून आत्तापासून अवघे काही तासच उरले आहे. सायंकाळी 5 वाजल्यानंतर प्रचारांच्या तोफा थंडावणार असून उमेदवारांच्या सभा रोड शोंचा धडाका बंद होणार आहे. काही काळच प्रचारासाठी उरला असल्याने उमेदवार मतदारांच्या दारोदारी फिरत आहेत.
