धक्कादायक! बीडमध्ये बनावट आधार काढल्याची तक्रार, निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र

बीडमधील बाहेरगावी वास्तव्य करणाऱ्यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करण्यात येत आसल्याचे निदर्शनास आल्यास गु्न्हा दाखल करण्यात येईल.

News Photo   2025 11 30T222833.462

News Photo 2025 11 30T222833.462

सध्या राज्यभरात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच वार आहे. (Beed) दोन दिवसांवर मतदान आलं आहे. असं सगळ असतानाच आता बीड येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड काढल्याचं समोर आलं आहे. असे बनावट आधार कार्ड काढून मतदान वाढवल जात किंवा त्यामध्ये गोंधळ केला जातो हे लक्षात घेऊन आता निवडणूक अधिकारी कविता जाधव यांनी एक पत्र काढलं आहे.

काय आहे पत्रात?

बीडमधील बाहेरगावी वास्तव्य करणाऱ्यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करण्यात येत आसल्याचे निदर्शनास आल्यास गु्न्हा दाखल करण्यात येईल. सर्वे आधार केंद्र, सेतु केंद्र आणि इतर तत्सम काम करणारे सेंटर यांना प्राप्त तक्रारीनंतर सुचना देण्यात येत आहे की, जर अशा पद्धतीने कुणी बनावट आधार कार्ड बनवल्याचं आढळ्यास मालकासह सहकाही ऑपरेटरवरी गुन्हा दाखल करण्यात येईल.

कोयता बंद, वाहतूक बंद, कारखाना बंद; बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं

त्याचबरबोर बनावट आधार कार्ड असणारे मतदानाच्या दिवशी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. मतदारांनी मतदान करण्यासाठी येताना फक्त आधार कार्ड घेऊन न येता मतदान कार्ड, ड्राविंग लायसन पासपोर्ट फोटो असेले बँक पासबुक यापैकी एक सोबत घेऊन यावे. तसंच, मतदान केंद्रावर M-Aadhar अॅप मार्फत बारकोडची पडताळणी करण्यात येईल याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी असं पत्र निवडणूक अधिकारी कविता जाधव यांनी काढलं आहे.

 

Exit mobile version