Download App

राजीनाम्याबद्दल मला अजित पवारांनीही… शरद पवारांनी ‘ते’ खरं सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता एकच चर्चांना उधाण आलंय. शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार दिसले नसल्याने अजित पवार नाराज आहेत की काय? असा सूर सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

अध्यक्षपद स्वीकारले तरी उत्तराधिकारी… पवारांनी स्पष्ट केली भूमिका

त्यावर बोलताना शरद पवारांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करीत पत्रकार परिषदेला सर्वच पत्रकार हजर राहतात का? असं म्हणाले आहेत. तसेच माझ्या निर्णयाची अजित पवारांना कल्पना दिलेली आहे. मला माझ्या निर्णयानंतर अजित पवारांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

Gautam Gambhir: विराटच नव्हे, तर कॅप्टन कूल धोनीलाही डिवचले, भारतीय संघातील खेळाडूचा गौप्यस्फोट

दरम्यान, शरद पवारांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याने आता पक्षाची सुत्र पवारांच्याच हाती असणार असल्याचं स्पष्ट झालं असून पुढी काळात पक्षात उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच माझे सर्वच सहकारी उत्तराधिकारी आहेत. पुढील काळात महाविकास आघाडी एकत्रच काम करणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, पक्षात आता काही संघटनात्मक बदल करणार असून पुढील काळात खासदार सुप्रिया सुळे पक्षाच्या अध्यक्ष होतील, या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

Tags

follow us