नाशिक : येत्या 26 मार्चला शिवसेना काय आहे ते कळेलच, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विरोधकांना घाम फोडला आहे. खेडच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंचा मोर्चा आता उत्तर महाराष्ट्राकडे वळाला आहे. येत्या 26 मार्चला नाशिकमधील मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. सभेआधीच संजय राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला आहे.
‘लोकसभेला दोनदा आपटलं आता विधानसभेतही आपटू’; राऊतांनी राणेंना डिवचले..
संजय राऊत म्हणाले, निवडणुक आयोगाला विचारून जनतेने शिवसेना प्रमुख पद बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंना दिलेलं नाही. आता निवडणूक आयोगाचा बाप आला तरी शिवसेना प्रमुख पद काढू शकत नसल्याचं ते ठामपणे म्हणाले आहेत.
तसेच लोकं बोलतात संजय राऊत टोकाचा, होय आहे मी. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुरुंगात जाऊन आलोय, गद्दारांसारखे गुडघे मी टेकले असते तर तुरुंगात गेलो नसतो, असाही टोला त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे.
ChatGPT च्या नवीन आवृत्तीने जगाला केले चकित, आजारावरही सांगते नेमके औषध
मी शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही, कारण असंख्य शिवसैनिक जे बसलेले आहेत तीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत मला शिवसैनिकांसाठी लढायचं, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुढचा संघर्ष अधिक तीव्र असेल, कठीण असेल पण लक्षात घ्या अंतिम विजय हा आपलाच असल्याचं संजय राऊतांनी मालेगावातील शिवसैनिकांना सांगितलंय. महाराष्ट्रात आणि दिल्लीत आपलंच राज्य असणार आहे तेव्हा पाहु ईडी आणि सीबीआय काय करते, असं खुलं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय.