Download App

Maharashtra Budget : आम्ही गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

  • Written By: Last Updated:

दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा गाजर हलवा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं होत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की “काही लोकं म्हणाले गाजर हलवा आहे, आम्ही तर गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती.” ठाणे येथे आयोजित शिवजंयती कार्यक्रमात ते बोलत होते. शिवजयंती कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की ही शिवजयंती आपल्या बाळासाहेबांनी घोषीत केलेल्या तिथीनुसार होत आहे. त्याचा मला अभिमान असल्याचं देखील म्हटलं.

यावेळी बोलताना त्यांनी नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून देखील फटकेबाजी केली. ते म्हणाले की अर्थ संकल्पातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करुन टाकला आहे. काही लोक फक्त बोलतात आपण करुन दाखवतो. अर्थसंकल्पामध्ये सर्वांचा विचार सरकारने केला, कारण हे गोर गरीबांचे सर्व सामान्यांचे सरकार आहे. असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान त्यांनी उपस्थित लोकांना अर्थसंकल्प पाहिला का? असा प्रश्न विचारला, त्यावर “एकदम ओके” असा जल्लोष लोकांनी केला.

हेही वाचा : घरगडी घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो, उद्धव ठाकरेवर भाजपाकडून बोचरी टीका

ते पुढे म्हणाले की काही लोकं म्हणाले गाजर हलवा आहे, आम्ही तर गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती. पण या अर्थसंकल्पातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करुन टाकला आहे. अर्थसंकल्प सादर होत असतानाच सभागृहात सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होते, अशा खोचक टोला त्यांनी लगावला.

ठाण्याचा विकास हाच आमचा ध्यास

ठाण्यात कार्यक्रम असल्याने यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “तुमच्या ठाण्याच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय त्यामुळे ठाण्याचा विकास करायचा आहे, सोबतच महाराष्ट्राचा विकास देखील करायचा आहे. महाराष्ट्राचा विकास हाच आपला ध्यास आहे. असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

follow us