घरगडी घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो, उद्धव ठाकरेवर भाजपाकडून बोचरी टीका

  • Written By: Published:
घरगडी घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो, उद्धव ठाकरेवर भाजपाकडून बोचरी टीका

काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा अर्थसंकल्प गाजर हलवा असल्याची खोचक टीका केली आहे.

त्यावर भाजकडून बोचरी टीका केली आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकौंटवरून ही टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत ही टीका केली आहे. या ट्विटमध्ये लिहले आहे की, “आपल्या बुद्धीचा आणि बजेटचा दुरान्वये संबध नाही, बजेट तुमच्या बुद्धीच्या आवाक्या पलीकडचं आहे. आणि घरगड्याला ‘गाजराचा हलवा’ वाटने साहजिकच आहे. घरगडी, घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो. त्यामुळे, घरगड्याला प्रत्येक गोष्टीत गाजराचा हलवा दिसतो.”

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी आजच काही औरंगाबाद जिल्ह्याती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो. अजूनही त्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी शासन गेलं नाही. याउलट या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना मधाचं बोट लावण्याचा आणि त्यांच्या भावनांशा खेळण्याचा प्रयत्न झाल्याची टीका त्यानी केली.

Budget Session 2023 : हा तर ‘चुनावी जुमला’ अर्थसंकल्प, अजित पवारांची सडकून टीका

हा गाजर हलवा अर्थसंकल्प आहे. अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला. गरजेत तो पडेल काय, असं म्हणतात. तसाच हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा गडगडाट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक योजना नाव बदलून सादर केल्या आहेत, जी योजा आम्ही मुंबईत सुरू केली, ती बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याोजना ही राज्यभर राबवण्यात येणार आहे, अशा शब्दात त्यांना सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube